जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन

By admin | Published: May 25, 2017 12:00 AM2017-05-25T00:00:15+5:302017-05-25T00:00:15+5:30

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, रोजगार-स्वयंरोजगार विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन, मराठी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्र

Anniversary of District Newspaper Vendor Team | जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन

जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, रोजगार-स्वयंरोजगार विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन, मराठी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्र म, वृत्तपत्र विक्रेत्यांनी सादर केलेले पथनाट्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील व्यक्तिंचा विशेष गौरव सोहळा अशा भरगच्च कार्यक्र मांनी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला.
कोपरी येथील राऊत शाळेत पार पडलेल्या सोहळ््यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यवसायातील अडचणींवर आधारित पथनाट्य सर्वांच्या पसंतीस उतरले. तसेच ‘सूर स्पर्श’ या कार्यक्रमात उपस्थितांना मराठी गीतांची मेजवानी मिळाली. यावेळी वृत्तपत्र विक्र ी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अरु ण दातार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भोईटे यांनी रोजगार-स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता परिवारातील नगरसेविका रु चिता मोरे यांचा महिला विक्रेत्यांनी सत्कार केला.
ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ठामपातील अनेक नगरसेवक, मुंबई, कल्याण,नवीमुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी तसेच ठाणे विक्रेता संघाचे राजेश मोरे, अजित पाटील, शंकर दुधाणे, नंदू देशपांडे, संदीप आवारे, शरद पवार, गुरु नाथ चिंचोले, राजू पिंगळे, विलास पिंगळे, संतोष परब, पप्पू बामले, अशोक कदम, भास्कर ठावरे, अशोक यादव, सुभाष गुप्ता, नंदू करले, रवी कर्डिले, सुदेश मेहता, सुशिल मेहता, कोकाटे, स्मिता खराडे, चंद्रकांत पवार, संजय बोराडे, मोहन मोरे उपस्थित होते.

Web Title: Anniversary of District Newspaper Vendor Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.