ग्रंथालय संमेलनाची पत्रिका जाहीर, शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:05 PM2018-03-29T16:05:40+5:302018-03-29T16:05:40+5:30

 Announcement of Library Magazine's Magazine, Massive Program in Centennial Libraries | ग्रंथालय संमेलनाची पत्रिका जाहीर, शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम

ग्रंथालय संमेलनाची पत्रिका जाहीर, शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम

Next
ठळक मुद्दे१ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील शतकपुर्ती ग्रंथसंग्रहालयांचे संमेलन संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्तेदोन दिवस ग्रंथ विक्री व प्रदर्शन

ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ््यानिमित्त रविवार १ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.३० पर्यंत संस्थेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहात एक दिवसीय महाराष्ट्रभरातील शतकपुर्ती करणाºया ग्रंथ संग्रहालयाचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध विषयांवर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार ३१ मार्च व रविवार १ एप्रिल रोजी ग्रंथसंग्रहालयाच्या तळमजल्यावर विविध प्रकाशक व पुस्तक वितरकांसाठी दोन दिवस ग्रंथ विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्याघटन अभिनेते व ज्येष्ठ लेखक अशोक समेळ यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात वाचकांना सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. रविवार १ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहत शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, कवी प्रविण दवणे, अरुण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते १२.३० यावेळेत डिजीटलायझेशन आणि ई बुक्स प्रात्यक्षिक या विषयावर माधव शिरवळकर व सारंग दर्शने यांचे पहिले सत्र, दुपारी १२.३० ते २ यावेळेत वाचनसंस्कृती रुजविण्याच्या विविध वाटा याविषयावर दुसरे सत्र यात नरेंद्र लाजेंवार, श्रीरंग खटावकर, प्रकाश देशपांडे, राजेंद्र वैती सहभागी होणार आहे. तिसरे सत्र दुपारी ३ ते ४.३० यावेळेत वाचनालये : आजची आणि उद्याची याविषयावर तिसरे सत्र तर दुपारी ४.३० ते सायं. ५.३० यावेळेत समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title:  Announcement of Library Magazine's Magazine, Massive Program in Centennial Libraries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.