ठाणे महापालिका कामगारांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:20 PM2018-10-22T16:20:55+5:302018-10-22T16:22:10+5:30

ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे.

Annuity grant of Rs. 15 thousand 100 for Thane Municipal corporation | ठाणे महापालिका कामगारांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

thane_mahapalika

Next
ठळक मुद्देसहाव्या वेतन आयोगाचाही तिढा सुटणारपरिवहनच्या कामगारांनाही सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे - ठाणे महापालिकेच्या कामगाराचा सानुग्रह अनुदानाचा तिढा सुटला असून यावर्षी त्यांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. तर कंत्राटी कामगारांना सानुग्रह म्हणून अतिरिक्त एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे १३ कोटींचा बोजा पाडणार आहे. महापालिकेत आतपर्यंत हे सर्वात जास्तीचे सानुग्रह अनुदान असल्याचे म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले. ठाणे महापालिकेचे १० हजार कायस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे.
                             ठाणे पालिकेकच्या विविध विभागात स्थायी, अस्थायी, ठोक पगारावरील कर्मचारी, अनुकंपा वारसा कर्मचारी अशा १० हजार कर्मचाºयांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाचा निर्णय सोमवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला. मागील वर्षी झालेल्या वाटाघाटीत पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा पालिकेच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने कामगारांना २० हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महिन्यापूर्वीच म्युनिसिपल लेबर युनियनने केली पालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र २० हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मान्य न करता कायस्वरूपी कामगारांना १५ हजार १०० तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे तेवढा पगार देण्यात येणार आहे.
              ठाणे महानगर पालिकेत कायस्वरूपी कर्मचाºयांची संख्या ५ हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्वावरील कर्मचारी २ हजार ५८, ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी १ हजार ५१, शिक्षण विभगातील ठोक पगारावर कर्मचारी २३ असे एकूण ८ हजार ४६७ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ७५० रु पयांची वाढ सानुग्रह अनुदानात करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी देखील पालिका कर्मचारी यांच्या सोबतच परिवहन सेवेच्या २ हजार २१७ कर्मचाºयांनी देखील यंदा २० हजाराच्या सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र त्यांनाही १५ हजार १०० सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे.
सहावा वेतन आयोगाचा तिढा लवकरच सुटणार -
ठाणे महापालिकेच्या कर्मचाºयांना सहावा वेतन अयोग लागू करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सहाव्या वेतन आयोगावर देखील चर्चा झाली असून डिसेंबर अखेर हा तिढा सोडवणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे रवी राव यांनी सांगितले. सहावा वेतन अयोग्य लागू झाल्यास पालिकेवर १५ ते २०कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.




 

Web Title: Annuity grant of Rs. 15 thousand 100 for Thane Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.