आणखी ३० आदिवासी वेठबिगारीतून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:27+5:302021-09-08T04:48:27+5:30
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिळंझे-चिंचपाडा येथील आदिवासींवर सावकारांकडून सुरू असलेल्या अन्याय व अत्याचाराचे भीषण वास्तव उघड झाल्यानंतर ‘लाेकमत’ने अन्यायग्रस्त ...
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिळंझे-चिंचपाडा येथील आदिवासींवर सावकारांकडून सुरू असलेल्या अन्याय व अत्याचाराचे भीषण वास्तव उघड झाल्यानंतर ‘लाेकमत’ने अन्यायग्रस्त आदिवासींना बाेलते करून त्यातील दाहकता समाेर आणली हाेती. त्यानंतर शासकीय यंत्रणांनी कारवाई आणखी तीव्र केली असून पिळंजे-चिंचपाडा येथील आणखी ३० आदिवासींची वेठबिगारीतून मुक्तता केली आहे. साेमवारी या आदिवासींना तहसीलदार अधिक पाटील यांनी प्रमाणपत्रांचे वाटप केले.
अनेक वर्षांपासून आदिवासींवर अत्याचार सुरू असून ताे दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे आदिवासींची वेठबिगारीतून मुक्तता झाली असली तरी त्यांना सावकारी पाशात अडवणारे आराेपी राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील हे मात्र गुन्हे दाखल हाेऊनही अद्याप फरार आहेत. त्यांच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात बंधबिगरी, मारहाण, महिलांवरील अत्याचार, मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत.