अंबरनाथमध्ये आणखी ३०० बेडचे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:15 AM2020-07-29T01:15:55+5:302020-07-29T01:16:30+5:30

पालिकेचा निर्णय : अतिदक्षता विभागाचीही केली जाणार सोय

Another 300-bed hospital in Ambernath | अंबरनाथमध्ये आणखी ३०० बेडचे रुग्णालय

अंबरनाथमध्ये आणखी ३०० बेडचे रुग्णालय

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमधील डेंटल कॉलेजमध्ये ५०० बेडचे रुग्णालय उभारल्यानंतर आता त्याच ठिकाणी आणखी ३०० बेड वाढविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यासोबतच शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या यूपीएससी सेंटरमध्ये ३०० बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी ५० बेड अतिदक्षता विभागासाठी ठेवण्यात येणार आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे उभारलेले कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रु ग्णांनाही शहरातच उपचार मिळावेत यासाठी ३०० बेडचे डेडिकेटेड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या रु ग्णालयात रु ग्णांवर खासगी रु ग्णालयाच्या धर्तीवर उपचार केले जाणार आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे रु ग्णालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या संदर्भातील पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सोमवारी अंबरनाथमध्ये आले होते. त्यांनी डेंटल कॉलेजमधील वाढीव ३०० बेडच्या कामाची पाहणी केली, सोबतच यूपीएससी सेंटरमधील कक्षाचीही पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाचे नियोजन दिले. शहरातील गरजू आणि गरिबांना खासगी रुग्णालयात आयसीयू उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिकेने स्वत: आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाचे काम त्वरित सुरू करून ते चालवण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले.

खासगी डॉक्टर उभारत आहेत सिटी रुग्णालय
सद्य:स्थितीत अंबरनाथमध्ये कोरोना रु ग्णांसाठी अतिदक्षता विभागाची सोय नसल्याने गंभीर रु ग्णांना अन्यत्र हलवावे लागत असल्यामुळे शहरातील खासगी डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू करत असलेल्या सिटी हॉस्पिटलला खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी एकूण ७० बेडचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी २५ बेड अतिदक्षता विभागासाठी असतील.

Web Title: Another 300-bed hospital in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.