ठाणे जिल्ह्यात सापडले आणखी ४८६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:17 AM2020-06-01T06:17:28+5:302020-06-01T06:17:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या ...

Another 486 patients were found in Thane district | ठाणे जिल्ह्यात सापडले आणखी ४८६ रुग्ण

ठाणे जिल्ह्यात सापडले आणखी ४८६ रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले. एकीकडे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा पार केला असताना दुसरीकडे ठामपातील रुग्णांनीही तीन हजारांचा तर कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण रुग्णसंख्येने एक हजारांचा आणि मिराभार्इंदरने सातशेचा टप्पा पार केला आहे.


नव्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२ वर पोहोचली आहे. ठामपा हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८९ झाला आहे. त्याचबरोबर १0६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याखालोखाल नवीमुंबईत ९४ नवीन रुग्ण निदान झाल्याने येथील एकूण रुग्णसंख्या दोन हजार २0४ झाली आहे. नवीमुंबईत तीन जण दगावल्याने तेथील मृतांचा आकडा ७३ झाला आहे. ८९ रुग्ण मिराभार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ७३८ वर गेली आहे. तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ झाला आहे. कल्याण डोंबिवलीत नवीन ५४ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक हजार ३४ वर पोहोचली आहे.

एका रुग्णाच्या मृत्यूने मृताचा आकडा २९ वर गेला आहे. अंबरनाथ येथे ३५ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १६६ झाली आहे. भिवंडीत २८ नवीन रुग्ण मिळून एकूण रुग्णसंख्या १४७ झाली आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात झाली आहे. उल्हासनगरला नवीन २५ रुग्ण मिळाल्याने एकूण संख्या ३६0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्णांमुळे ठाणे ग्रामीणचा एकूण रुग्णांचा आकडा ३६१ वर गेला आहे. बदलापूर येथे १२ नवीन रुग्ण मिळाल्याने एकूण रुग्णसंख्या २२५ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

वसई-विरारमध्ये २० नवे रुग्ण
वसई : वसई-विरार शहर पालिका हद्दीत रविवारी २० नवे रुग्ण आढळले. तर, नालासोपाºयातील ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५२ वर पोहचली आहे. वसई, विरार व नालासोपारा पूर्व-पश्चिम भागातून रविवारी तीन रुग्ण मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. आजवर पालिका हद्दीत एकूण २९२ जण मुक्त झाले. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या २६ आहे. ४३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another 486 patients were found in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.