आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

By admin | Published: May 30, 2017 05:32 AM2017-05-30T05:32:27+5:302017-05-30T05:32:27+5:30

शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून

Another 50 dl Water needs | आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर मीना आयलानी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. पाणीचोरीकरिता कुप्रसिद्ध असलेल्या शहराला जादा पाण्याची सोय करताना मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवण्याची सूचनाही आयलानी यांनीच केली.
उल्हासनगरातील ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून गळतीमुळे लाखो लीटर पाणी नाल्यात जात आहे. पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीची मागणी महापालिका राज्य व केंद्र शासनाकडे करणार आहे. तत्पूर्वी पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा देण्याकरिता अतिरिक्त ५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी आयलानी यांनी केली.
सध्या एमआयडीसीकडून पाठवण्यात येणारे पाणीबिल हे कोट्यवधी रुपयांचे असून ते भरण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने बिल माफ करण्याची विनंती महापौरांनी केली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने उद्योगमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात महापौर आयलानी यांच्यासह उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कांचन लुंड, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा यांचा समावेश होता.
उल्हासनगरला सध्या दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कपात लागू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार तब्बल ४० टक्के पाणीगळतीमुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आहे. यामुळे पाणी असूनही अनेकदा नागरिकांना टंचाईचा सामाना करावा लागतो.

Web Title: Another 50 dl Water needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.