ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:11 AM2024-09-06T11:11:21+5:302024-09-06T11:12:49+5:30

बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Another accident on Ghodbunder Road in Thane The ST bus boarded directly at the bifurcation of the bridge | ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर

ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर शुक्रवारी पुन्हा चौथ्या दिवशीही अपघाताची घटना समोर आली. दोन क्रेनच्या मदतीने वाहतूक शाखेने ही बस बाजूला केली. बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त  पंकज शिरसाठ आणि सहायक आयुक्त विजयसिह भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी   घटनास्थळी  धाव घेत मदतकार्य राबवून वाहतूक सुरळीत केली. सकाळी घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक तुलनेने कमी असल्याने वाहतुकीवर तितका परिणाम जाणवला नाही.

नंदुरबार आगारातील ही एस.टी. बस असून मानपाडा पुलावर हा अपघात घडला. यातील चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Another accident on Ghodbunder Road in Thane The ST bus boarded directly at the bifurcation of the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.