ठाण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खून प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:23 PM2023-09-24T20:23:26+5:302023-09-24T20:23:41+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: आरोपींची संख्या तीन
ठाणे : राबोडीतील महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने हबीब अजमईन शेख (३६, रा. राबोडी, ठाणे) याला रविवारी तब्बल तीन वर्षांनी अटक केली आहे. याच प्रकरणात याअधी दोघांना केली असून यातील एका फरारी आरोपीच्या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हबीबला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
मनसेचे पदाधिकारी जमील यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोरुन २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरुन जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी जमील यांच्यावर गोळीबार करुन पोबारा केला होता. गंभीर जखमी अवस्थेतील जमील यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले होते.
या गुन्ह्यातील मोटारसायकलस्वार शाहीद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाºया इरफान शेख याला उत्तरप्रदेशातून अशा दोघांना यापूर्वीच गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. यातील आणखी एक आरोपी ओसामा शेख हा फरार असून त्याच्यासह मुख्य सुत्रधाराचाही शोध अद्याप लागलेला नाही. ओसामाचा शोध सुरु असतांनाच युनिट एक या पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खूनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अटक केली.
आरोपीच्या शोधासाठी उत्तरप्रदेशात १९४ दिवस ठाणे पोलिसांचा तळ-
महाराष्टÑाच्या अधिवेशनात जमील हत्याकांड गाजल्याने ठाणे पोलिसांसमोर या खूनाचे गूढ उकलण्याचे आव्हान हाते. त्यामुळेच मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकासह खंडणी विरोधी पथकातील २० अधिकारी, ३५ अंमलदारांनी १५ पेक्षा अधिक वेळा उत्तर प्रदेशात फेºया मारल्या. त्यासाठी १९४ दिवस हे पथक त्याठिकाणी तळ ठोकून होते. अजूनही हा तपास सुरुच आहे.