गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत
By अजित मांडके | Published: October 22, 2022 02:23 PM2022-10-22T14:23:49+5:302022-10-22T14:24:38+5:30
ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणोश जाधव याच्यावर गोळीबार झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणोश जाधव याच्यावर गोळीबार झाला होता. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्याच्या हत्येप्रकरणी आता नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शशिकांत वटकर असे असून त्याला ठाण्यातील खारटन रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार एवढी झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडय़ातील घंटाळी भागात गोळीबार झाला होता. त्यात एक तरुण जखमी झाला. त्यानंतर या हल्लेखोरांनी येऊर येथे जाऊन कुख्यात गुंड गणोश जाधव याच्या डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली होती. त्यानंतर उपचारार्थ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ठाणो पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा शोध सुरू होता. दरम्यान, याप्रकरणात शुक्र वारी गुन्हे अन्वेषण शाखा आणि नौपाडा पोलिसांनी गोळी झाडणारा विपीन मिश्र याच्यासह त्याचे साथिदार सुरज मेहरा, सौरभ शिंदे यांना अटक केली होती. आरोपींनी घंटाळी रोड येथून ये-जा करण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला होता. त्यामुळे या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सुरू होता.
दरम्यान, यातील रिक्षा चालक हा खारटन रोड परिसरात राहत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शशिकांत वटकर याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे या गोळीबारात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी दिली.