ओडिसामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:48 AM2021-09-07T00:48:32+5:302021-09-07T00:50:30+5:30
ओडिसामधून गांजाची तस्करी करणाºया टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिसा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ओडिसामधून गांजाची तस्करी करणाºया टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिसा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यानेच रमेश बादई आणि दीपक जेना यांच्याकडे तीन लाख ५० हजारांचा ३५ किलो गांजा सोपविल्याचे चौकशीतून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने २९ आॅगस्ट २०२१ रोजी रमेश आणि दीपक या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीतून ३५ किलोचा गांजाही जप्त केला होता. सखोल चौकशीमध्ये ओडिसा राज्यातून त्यांनी हा गांजा आणल्याची कबूली दिली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याच दोघांच्या चौकशीतून त्यांनी ओडिसा येथील श्रीकांत याच्याकडून हा गांजा आणल्याची कबूली दिली होती. त्याच आधारे बडे यांच्या पथकाने ओडिसा पोलिसांच्या मदतीने त्यालाही ३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला ६ सप्टेंबरपर्यंत ट्रान्सिस्ट रिमांड मिळाली होती. सोमवारी पुन्हा त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
* यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओडिसातून गांजाची तस्करी करणाºया दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २० किलोचा गांजा हस्तगत केला होता. आतापर्यंत ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे. श्रीकांत याने ठाणे मुंबईमध्ये आणखी कोणाला गांजाची तस्करी केली, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी सांगितले.