ठाण्यात आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:14 AM2018-02-28T03:14:15+5:302018-02-28T03:14:15+5:30
कर्जाच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना लुबाडणाºया आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केला.
ठाणे : कर्जाच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना लुबाडणाºया आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केला. याप्रकरणी गुजरात आणि राजस्थानच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरील आनंदनगरातील उन्नती वुडस् सोसायटीमध्ये हे बोगस कॉल सेंटर असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्या आधारे सोमवारी मध्यरात्री धाड टाकून बडोदा येथील राकेश अनिल कोंडवाणी (२१) आणि राजस्थानमधील बिलियावास येथील जोरावत शेरसिंग राजपूत (२८) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप आणि चार मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यात सुमारे ६०० अमेरिकी नागरिकांचा तपशील मिळाला आहे.आयबीम, एक्स-लाइट किंवा स्काइपच्या मदतीने हे आरोपी अमेरिकी नागरिकांशी संपर्क साधायचे.