अभिनय कट्ट्याच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरा, संगीत कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सफर संगीताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:50 PM2019-01-05T16:50:47+5:302019-01-05T16:54:48+5:30

जानेवारी २०१८ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकारांना मग गायक , वादक किंवा नृत्य सादर करून आपली कला व्यक्त करणारा प्रत्येक कलाकार, सर्वांना संगीताचं एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याऱ्या संगीत कट्ट्याला कलाकारांसोबत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागामुळे एक वर्ष पूर्ण होतंय. 

Another celebrated thriller in the history of cut-acting, on the anniversary of the music-cut journey, Sangeetachchi | अभिनय कट्ट्याच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरा, संगीत कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सफर संगीताची

अभिनय कट्ट्याच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरा, संगीत कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सफर संगीताची

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्याच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरादिव्यांग कलाकारांसाठी दिव्यांग संगीत कट्टा तिसऱ्या शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड इज गोल्ड

ठाणे : गेल्या एक वर्षात गायनाची आणि वादनाची आवड असलेल्या शेकडो कलाकारांनी आपली कला या संगीत कट्टयावर सादर केली व स्वतःला आणि उपस्थित रसिकांना समाधान दिलं. आपल्याला गाणं येतंय पण आपण फक्त बाथरूम सिंगर आहोत असं वाटणाऱ्या अनेक कलाकारांनी संगीत कट्ट्याच्या पब्लिक राऊंड मध्ये गात स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आणि आता नियमित गाणं सुरू केलं. बाल कलाकारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच संगीत कट्टयावर आपली कला सादर केली आहे, एवढंच नाही तर संगीत कट्ट्याच्या कलाकारांना घेऊन विविध गाण्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर करायला सुरूवात झाली.

संगीत कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त या शुक्रवारी सफर संगीताची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात खरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संगीत कट्ट्याची सुरुवात ओंकार प्रधान या गाण्याने रुपाली कांबळे यांनी केली. विनोद पवार यांनी 'तेरे मेरे सपने', ज्ञानेश्वर मराठे यांनी 'मेरा जुता है जपानी', किरण म्हापसेकर यांनी ए' जिंदगी गले लगा ले', गौरी घुले यांनी 'रैना बिती जाये रे', सायली कांगणे हिने 'झाल्या तिन्ही सांजा' , राजू पांचाळ यांनी 'कौन तुझे यु प्यार करेंगा', सुप्रिया पाटील यांनी 'सांज ये गोकुळीं' हे गीते सादर केली. विनोद पवार आणि गौरी घुले ह्यांच्या 'तुझे जीवन की दोर से' ह्या गीताने प्रेक्षकांनी ताल धरला.तर राजु पांचाल ,निशा पांचाळ आणि विनोद पवार ह्यांनी सादर केलेल्या हम किसींसे कम नाही ह्या गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.ज्येष्ठ गायक प्रभाकर केळकर ह्यांनी 'राज ए दिल ऊनसे छुपाया ना गया' ,'आसू समज के  क्यू मुझे आँख से गिरा दिया ' ही मोहम्मद रफी ह्यांची गाणी सादर करून रफीयुगाची झलक सादर केली. विजय वागळे यांनी व्हिसल सॉंग भन्नाट होते. दामिनी पाटीलने सॅक्सओफोन वाजवून धम्माल उडवून दिली. हरिष सुतार यांनी 'सुरमयी अखीयोंमे' हे येसूदासांचे गाणं गात सदमाची आठवण करून दिली.पंकज साळुंखे यांनी लख्ख पडला प्रकाश हा गोंधळ सादर केला.राज सिंहलकर ह्याने कुणाल ह्याच्या साथीने कीबोर्ड वर गोव्याच्या किनाऱ्यावर गीताचे सादरीकरण  प्रेक्षकांना नाचवून गेले.  राजेंद्र गायकवाड, श्रीमती यंदे, परी पिंगळे , चिन्मय मौर्य व अखिलेश यादव यांचं नृत्य, मैत्रेय दिवाडकर, काव्य कुऱ्हाडे या बालकलाकारांनी आपली कला सादर केली. अशा प्रकारे संगीत कट्ट्याच्या कलाकारांनी सप्तसुरांचे विविधरंगी सादरीकरण केले.  किरण नाकती यांनी निवेदनातून प्रत्येक कलाकाराची ओळख त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि आजपर्यंतच्या संगीत कट्ट्याच्या प्रवासातल्या गमतीजमती सांगत करून दिली. सदर प्रसंगी सभागृहनेते नरेश म्हस्के ह्यांनी उपस्थित राहून संगीत कट्ट्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिनय कट्टयासोबतच संगीत कट्टा ,वाचक कट्टा, दिव्यांग कला केंद्र ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीची मुख्य केंद्र बनली आहेत असे मत नरेश म्हस्के ह्यांनी व्यक्त केले.  २०१८ या संपूर्ण वर्षभरात गायक व वादकांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन संचालक किरण नाकती यांनी प्रत्येक वयोगटासाठी संगीत कट्ट्याचे प्रयोजन २०१९ साठी केले आहे. म्हणजेच दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी संगीत कट्ट्याच्या नियमित कलाकारांसाठी संगीत कट्टा असेल. संगीत कट्याचे कलाकार पहिल्या शुक्रवारी आपले गीत वादन नृत्य सादर करू शकतात. दुसऱ्या शुक्रवारी बालसुरांची बाल मैफिल : बालकलाकारांसाठीचा विशेष संगीत कट्टा होणार आहे, आज प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलाने गाणं गायला हवं, तबला ,पेटी सर्व वाद्यं वाजवायला हवीत तसेच सर्व प्रकारची नृत्य करावीत याकरिता पालक आपल्या मुलांना विविध क्लासेसमध्ये टाकतात. परंतु या सर्व बालकलाकारांना आपल्या हक्काचं एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या संगीत कट्ट्याचे आयोजन होणार आहे.

 

 तिसऱ्या शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड इज गोल्ड: 

प्रत्येकाला गाण्याची , वादनाची आवड असतेच पण आपल्या परिस्थितीतीमुळे किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे ती आवड तारुण्यात तशीच राहून गेलेली असते. परंतु एकदा का आपली मुलं मोठी झाली आणि सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर आपलं गाणं , वाद्य वाजवण्याची संधी या सर्व ज्येष्ठ कलाकारांना मिळावी या उद्देशाने तिसऱ्या शुक्रवारी ज्येष्ठांच्या संगीत कट्ट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 

आणि शेवटच्या शुक्रवारी ठाणे महानगरपालिका समाजविकास विभाग व दिव्यांग कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कलाकारांसाठी दिव्यांग संगीत कट्टा: 

गेली २ वर्षे दिव्यांग कला केंद्र हे विशेष मुलांचे कला केंद्र यशस्वीपणे चालवणाऱ्या किरण नाकती यांनी या विशेष मुलांना गाणं व नृत्याचे प्रशिक्षण तर सुरू ठेवलेच आहे , परंतु या संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने समाजविकास विभाग व दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दिव्यांग संगीत कट्टा सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून या दिव्यांग कलाकारांनी आपल्या अंगीभूत असलेल्या कलागुणांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण व्हावी. असा संकल्प किरण नाकती यांनी केला आहे.

संगीत कट्ट्यामुळे आम्हाला आमचं गाणं आणि वाद्यं सादर करण्याची संधी आम्हाला मिळू लागली आहे याचं आम्हाला खूप समाधान आहे आणि हि चळवळ ठाण्यात सुरू आहे याचा सर्व ठाणेकर कलाकारांना सार्थ अभिमान आहे असं म्हणत उपस्थित गायक , वादक व रसिक प्रेक्षकांनी संचालक किरण नाकती यांचे आभार मानले.

Web Title: Another celebrated thriller in the history of cut-acting, on the anniversary of the music-cut journey, Sangeetachchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.