ठाण्यात आणखी एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या झाली १४, खरबदाराची उपाय म्हणून कळव्यातील ते हॉस्पीटल पालिकेने केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:27 PM2020-04-03T16:27:59+5:302020-04-03T16:28:26+5:30
ठाण्यात दोन दिवसात तीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही १४ झाली आहे. त्यातही त्या वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याबरोबरच कळव्यातील एक खाजगी रुग्णालय देखील पालिकेने आता सील केले आहे.
ठाणे : कळव्यातील साईबाबा नगर परिसरात अढळलेला ५९ वर्षीय कोरोना रु ग्णाने प्राथमिक उपचार कळव्यातीलच जवळच्या खाजगी रु ग्णालयात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाच्या वतीने हे रु ग्णालयच आता सील करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील स्टाफला हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले असून नेमके किती जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे ठाण्यात शुक्रवारी आणखी एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह म्हणून आढळला आहे. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची संख्या ही १४ वर गेली आहे.
ठाणे शहरात मागील दोन दिवसांपासून एकही कोरोना पॉझीटीव्ह आढळला नव्हता, त्यामुळे ठाण्यासाठी गेले दोन दिवस आशादाय चित्र होते. मात्र गुरु वारी पुन्हा एकदा यामध्ये दोन रु ग्णांची भर पडली असून या दोन्ही केसेस प्रशासनाची झोप उडवून देणाऱ्या आहेत.
काजूवाडी परिसरात एका खाजगी दवाखाना असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील रुग्णांचा शोध सुरु आहे. दुसरीकडे कळव्यातील साईबाबा नगरमध्ये ज्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे, त्या वृद्धाने जवळच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतले असून ३० आमि ३१ मार्चला ते याच हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये आले होते अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सुद्धा आता क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने हे हॉस्पिटल सील करण्यात आले असून यामध्ये हॉस्पिटलचा स्टाफ आणि इतर रु ग्ण अशा किती जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कळव्यातील हे सर्वात जुने हॉस्पिटल असून या ठिकणी ओपीडीसाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आता या रु ग्णांच्या संपर्कात आलेले ओपीडीमधील इतर रु ग्ण, तसेच ज्या डॉक्टरांनी या रु ग्णाला तपासले आहे त्या डॉक्टरांच्या देखील संपर्कात आलेले इतर रु ग्ण या सर्वांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता प्रशासना समोर आहे.
ठाणे शहरात गुरु वारी एका वैद्यकीय अधिकारी आणि एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी यात आणखी एका रु ग्णांची भर पडली आहे. लोढा पॅरेडाइज या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या या रु ग्णावर मुंबईच्या एका खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. या रु ग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का ? तसेच तो कोणाच्या संपर्कात आला होता का याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे शहरात आता कोरोना पॉसिटीव्ह रु ग्णांची संख्या १४ झाली असून या रु ग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.