ठाण्यात आणखी एका मादी वानराचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:58 PM2020-12-28T23:58:08+5:302020-12-29T00:01:10+5:30
ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर येथे आणखी एका वानराचा उंचावरुन पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर येथे आणखी एका वानराचा उंचावरुन पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे ठाण्यात वानरांच्या मृतांची संख्या चार झाली आहे.
वागळे इस्टेट रोड क्रमांक २८ येथे २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक वानर जखमी अवस्थेत आढळले होते. याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या माकडाला ताब्यात घेतले. त्याला वनविभागाच्या परवानगीने ब्रम्हांड येथील एसपीसीएच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. दोन वर्षांच्या या मादी माकडाला उंचावरुन पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यातच त्याचा मृत्यु झाला. वागळे इस्टेट परिसरात वानरांच्या वाढत्या मृत्युमुळे वनविभाग तसेच प्राणी प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.