पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 01:32 AM2019-08-16T01:32:50+5:302019-08-16T01:33:05+5:30

कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्याने सध्या होणारी वाहतूककोंडी आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे.

Another flyover near Patripulan, MSRDC proposed to rail | पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव

पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव

googlenewsNext

- अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्याने सध्या होणारी वाहतूककोंडी आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात आराखडा मंजुरीसाठीचे नियोजन रेल्वेला २१ जुलैला दिले आहे. मात्र, रेल्वेकडून त्यास अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पत्रीपुलाशेजारीच केडीएमसीने बांधलेला दुपदरी उड्डाणपूल सध्या वापरला जात आहे. मात्र, तो अपुरा पडत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तर, जुन्या पत्रीपुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे प्राथमिक काम सुरू आहे. त्यामुळे हा पूल झाल्यानंतर एकूण चारपदरी रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. राज्य रस्ते महामंडळाचा आणखी एक १११ मीटर लांब आणि ११ मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या पुलासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे, असेही महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.

जुना पत्रीपूल जेथे पाडला, त्या जागी प्रस्तावित नवा पूल बांधण्याचा अधिकाºयांचा मानस आहे. तर, महापालिकेच्या सध्याच्या पुलाला लागून असलेल्या मोकळ्या नवीन पुलासाठी खोदकाम सुरू आहे, असे सांगण्यात आले. जर नवा पूलही झाला, तर एकूण सहापदरी पूल होतील आणि त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केला.

वर्षभरात होणार बांधणी?

राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवीन पुलाचा प्रस्ताव मिळाल्याचे रेल्वे अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दुसरीकडे या पुलास मध्य रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर पूल उभारण्यासाठी नियोजन आणि प्रत्यक्ष बांधणी यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल, असे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी म्हणाले.
सध्या ज्या पुलाचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे, त्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.

Web Title: Another flyover near Patripulan, MSRDC proposed to rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.