घोलाई नगरमध्ये पुन्हा भूस्खलन; ८ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:40 PM2021-09-01T14:40:17+5:302021-09-01T14:41:21+5:30
मंगळवार पासून जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लागली आहे. ठाण्यातही मंगळवार पासून पाऊस सुरु आहे.
ठाणे - कळवा घोलाई नगर येथे पुन्हा बुधवारी पहटेच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेत ८ वर्षीय सुश्री देवंशी चव्हाण ही चिरमुडी किरकोळ जखमी झाली आहे. तर ज्या घरावर मातीचा ढिगारा आला, त्या घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे महिनाभरातील ही तिसरी घटना ठरली आहे.
मंगळवार पासून जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लागली आहे. ठाण्यातही मंगळवार पासून पाऊस सुरु आहे. त्यातच रात्री देखील पाऊस सुरु असतांना कळवा घोलाई नगर येथील जीवन खोल चाळ येथे बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले आणि मातीचा ढिगारा मनोज मायकेल यांच्या मालकीच्या घराच्या घरावर पडला. त्यामध्ये घराच्या छताचे नुकसान झाले असून ते घर मायकेल यांनी सुशील डिके यांना भाड्याने दिले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणो महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक चिमुरडी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका:यांनी दिली. दरम्यान मागील महिना भरात ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेत पाच जणांची जाव गेला होता. त्यानंतर झालेल्या दुस:या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नव्हती. परंतु बुधवारी पुन्हा या भागात अशीच घटना घडल्याने येथील अनाधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.