बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2022 08:14 PM2022-10-18T20:14:13+5:302022-10-18T20:14:24+5:30

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई, यापूर्वी १६ जणांना केली अटक

Another member of the gang who cheated foreign nationals through fake call center arrested | बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक

बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक

Next

ठाणे: ठाण्यातील वागळे स्टेट भागात बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे परदेशातील नागरिकांची आर्थिक लूट करणाºया सिद्धेश भार्इंडकर (३३, रा. मुलूंड, मुंबई) याच्यासह १६ जणांच्या टोळीला ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. याच टोळीतील दीपक वसीटा या अन्य एका आरोपीला मंगळवारी अहमदाबाद येथून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील मुलुंड चेक नाका येथे आरएन सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असून कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या पथकाने  ३० सप्टेंबर २०२२ रोजी या कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटर चालक सिद्धेश भाईडकर आणि सानिया जैस्वाल (२६, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्यासह १६ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचाच साथीदार वसीटा यालाही अटक करण्यात आली आहे. कॉल सेंटरमधील टेलिकॉलर्स आयबी सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशी नागरिकाना वेगवेगळया कारणांनी धमकावत असे. त्यानंतर गिफ्टकार्डच्या माध्यमातून ही टोळी परदेशी नागरिकांकडून खंडणी उकळत होती, असेही तपासात उघड झाले आहे.

Web Title: Another member of the gang who cheated foreign nationals through fake call center arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे