अंबरनाथच्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:22 AM2020-04-18T00:22:44+5:302020-04-18T00:40:06+5:30
अंबरनाथचा रहिवासी असलेला मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागन झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येताच त्याच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अंबरनाथ - अंबरनाथचा रहिवासी असलेला मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागन झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येताच त्याच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. हा व्यक्ती अंबरनाथ पूर्व भागातील असुन अंबरनाथमध्ये आता कोरोनाचे चार रुग्ण झाले आहे.
अंबरनाथमध्ये पहिला कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुबातील दोघांनाही कोरोनाची लागन झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असुन इतर संपर्कात आलेल्या 20 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या 20 जणांची चाचणी नेगेटीव्ह आल्याने अंबरनाथ पश्चिम भागातील कोरोनाचा प्रभाव रोखणो शक्य झाले आहे. अंबरनाथ पश्चिम भाग सुरक्षा झोनमध्ये आलेले असतांनाच आता पूर्व भागात देखील कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील कोरोनाग्रस्त व्यक्ती हा मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षक आहे. सोमवारी तो घरातच होता. त्यानंतर ते कामावर गेले. बुधवारी त्यांचा कोरोना टेस्ट ही पॅङोटिव्ह आली आहे. त्यांच्यावर कस्तुबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दुसरीकडे अंबरनाथ पूर्व भागातील वडवली परिसरातील एका रुग्णाची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. हा रुग्ण डोंबिवलीत डायलेसिस साठी गेला होता. मात्र ज्या रुगणालयात ते गेले होते त्या ठिकाणच्या वैद्यकिय कर्मचा-यांनाही कोरोनाची लागन झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यानुसारच अंबरनाथच्या रुग्णाची देखील चाचणी केली जाणार आहे. त्या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.