उत्तनच्या मच्छीमारांनी आणखी एका व्हेल माशाला दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:50 PM2021-05-15T19:50:23+5:302021-05-15T19:50:51+5:30
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात जाळ्यात अडकलेल्या आणखी एका व्हेल माशाला जीवदान दिले . बोटीला व्हेलचा फटका लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . परंतु जीवाची पर्वा न करता ह्या मच्छीमारांनी व्हेलची जाळे कापून सुटका केली .
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात जाळ्यात अडकलेल्या आणखी एका व्हेल माशाला जीवदान दिले . बोटीला व्हेलचा फटका लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . परंतु जीवाची पर्वा न करता ह्या मच्छीमारांनी व्हेलची जाळे कापून सुटका केली.
उत्तनच्या नवीखाडी येथील नाखवा कॅसलिन लंगडीमरी यांची विसावा नावाची मासेमारी बोट आहे . तांडेल डॉल्टन डुंगा व १८ मच्छीमार हे बोटीत भागीदार आहेत. शनिवारी समुद्र किनाऱ्या पासून सुमारे ४२ किलोमीटर इतक्या लांब समुद्रात असताना मासेमारी साठी १३ जाळी टाकली होती . त्यातील एका जाळ्यात भलामोठा व्हेल मासा अडकला .
सुमारे २० फूट लांब आणि अंदाजे २ हजार किलो वजनाचा हा भलामोठा व्हेल जाळ्यात अडकल्याने त्याला सोडण्यासाठी मच्छीमारांची एकच धावपळ झाली . त्यातच व्हेलचा बोटीला फटका बसला असता तर बोटीचे मोठे नुकसान होण्यासह बोट बुडण्याची भीती सुद्धा होती . मध्येच व्हेल खवळला कि भीती वाटायची असले मच्छीमारांनी सांगितले . अथक प्रयत्ना नंतर जाळी कापून व्हेलची सुटका करण्यात मच्छीमाराना यश आले . जाळीचे सुमारे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे .
ह्या आधी बुधवार १२ मे रोजी उत्तनच्या भाटेबंदर येथील डेव्हिड गऱ्या यांच्या सहारा मच्छिमार बोटीच्या जाळ्यात सुमारे २० फूट लांबीचा आणि अंदाजे १५०० किलो इतका वजनाचा व्हेल मासा सापडला होता . मच्छीमार व खलाशी यांनी जाळे कापून त्या व्हेल माशाची सुटका केली होती .