विनामास्क फिरल्यास बदलापुरात अँटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:36+5:302021-05-21T04:42:36+5:30

बदलापूर : मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ही बदलापुरात काही नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे आता अशा ...

Antigen test in Badlapur if you walk around without mask | विनामास्क फिरल्यास बदलापुरात अँटिजन टेस्ट

विनामास्क फिरल्यास बदलापुरात अँटिजन टेस्ट

Next

बदलापूर : मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ही बदलापुरात काही नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे आता अशा बेफिकीर नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय कुळगाव- बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत शासनासह नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरही अनेक लोक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आल्याने नगरपरिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारून मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली. मात्र, त्यानंतरही अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांची अँटिजन टेस्ट करण्याचे नगरपरिषद प्रशासनाने ठरविले आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषद मोबाईल टेस्टिंग व्हॅनद्वारे विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांची रवानगी सोनिवली येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. अलीकडेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी मोबाईल टेस्टिंग व्हॅनला संरक्षण मिळण्याबाबतची पत्र बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याला दिले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी असे प्रयोग करण्यात येत आहेत. आता बदलापुरात ही हा प्रयोग राबविण्यात येणार असून त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांना आळा बसून कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासही मदत होणार आहे.

--------------------

Web Title: Antigen test in Badlapur if you walk around without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.