गणेश विसर्जन घाटावर असणार अँन्टीजन चाचणी केंद्र, बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:40 PM2022-07-27T16:40:58+5:302022-07-27T16:41:12+5:30

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

Antigen testing center will be at Ganesh Visarjan Ghat arrangement will also be made to give booster dose | गणेश विसर्जन घाटावर असणार अँन्टीजन चाचणी केंद्र, बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था 

गणेश विसर्जन घाटावर असणार अँन्टीजन चाचणी केंद्र, बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था 

Next

ठाणे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. प्रत्येक विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश देतानाच यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तर कोरोनाची खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे.  

सकाळी महापालिका त्यांनी शहरातील उपवन तलाव, कोलशेत महाविसर्जन घाट, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा, मासुंदा तलाव, कोपरी व रायलादेवी तलाव आदी ठिकाणच्या विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे तसेच शहरात इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागास दिले. तसेच विसर्जन घाटावर आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे, गणेशमूर्ती विसर्जन फिरते स्विकृती केंद्रासाठी, निर्माल्य वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यानी संबंधितांना दिले.

श्री गणेश मूर्तीचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने एकूण ७ मोठे विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मूर्तीबरोबर मोठया आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिका श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारणार आहे. तसेच प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था असणार आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे.

Web Title: Antigen testing center will be at Ganesh Visarjan Ghat arrangement will also be made to give booster dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे