महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 27, 2023 06:05 PM2023-11-27T18:05:09+5:302023-11-27T18:05:21+5:30
बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली.
ठाणे: शासन म्हणतेय वेठबिगार नाहीत पण प्रत्यक्षात वेठबिगार आहेत. महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत. बालकामगार हा या राज्याला शाप आहे. प्रत्येक बालकामगार आहे म्हणून तो शाळाबाह्य आहे आणि शाळाबाह्य असल्यामुळे तो बालकामगार आहे असे प्रतिपादन बाल कामगारांसाठी झटणाऱ्या अनुराधा भोसले यांनी केले. बालकामगारासारख्या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
बालकामगारांच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांच्या पायाला दिशा देण्यासाठी अहमदनगरवरून कोल्हापूरला आलेल्या भोसले यांनी बालमजुरीच्या नावाखाली होणारी लहान मुलांची घुसमट, शोषण, अन्याय हे शोधून त्यांच्यासाठी अवनीच्या माध्यमातून त्या पुढे सरसावल्या. त्यांच्या कार्यासाठी समाजसेवक क्षेत्रासाठी त्यांना मृदगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विठ्ठल उमप फाउंडेशन मृदगंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी बाल कामगारांचे होणारे शोषण याकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.
बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी अडीच लाखांमध्ये ऊस तोडायला वीटभट्टी कामगार येतात हे विदारक चित्र पाहिले तर अजून स्वतंत्र मिळायचा आहे का? हा प्रश्न पडतो. गोऱ्हे याना त्या म्हणाल्या की, विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ऊसतोड कामगारांची मुले शाळेत का जात नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. बालकामगारमुक्त भारत असावे आपण क्रिकेटकडे संपूर्ण भाग डोळे लावून बसले होतो भारत जिंकावा यासाठी मनामध्ये प्रार्थना करत होतो. परंतु दुसरीकडे बालकामगारांच्या प्रश्नाकडे आपण पाहत नाही. महाराष्ट्राची बालकामगार हा प्रश्न इतिहास जमा होऊ शकतो त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.