विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:28+5:302021-06-03T04:28:28+5:30
ठाणे : वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची वैधता तपासून ...
ठाणे : वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोकण विभागातील विद्यार्थी, (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अर्जदारांनी विहीत कालमर्यादेत जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकण प्रशासकीय विभागातील वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एसटी राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची जात पडताळणीची कार्यवाही विहीत कालमर्यादेत पूर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा जात पडताळणी प्रस्ताव ठाणे येथील समिती कार्यालयास सादर केला असेल, तर त्यासंदर्भात पुढील पडताळणी कार्यवाही करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव, पत्ता व इतर आवश्यक माहितीसह विनंती अर्ज या कार्यालयाचे ई-मेल आयडी tcscthane@yahoo.com वर सादर करावा, विद्यार्थी पालकांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळली जावी, विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण व्हावी, असे आवाहन सहआयुक्त, कोकण विभाग यांनी केले आहे.