भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांचे अर्ज बाद
By नितीन पंडित | Published: May 4, 2024 11:29 PM2024-05-04T23:29:39+5:302024-05-04T23:30:01+5:30
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार सकाळी पार पडली.या छाननी प्रक्रियेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात ...
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार सकाळी पार पडली.या छाननी प्रक्रियेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाच अर्ज बाद करण्यात आले असून लोकसभेत ३६ उमेदवारांचे ४३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरले असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण ४१ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले होते.या सर्व नामनिर्देशन अर्जाची शनिवार छाननी करण्यात आली.यावेळी निवडणूक आयोगाचे भिवंडी लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक राजनविर सिंग कपूर हे उपस्थित होते. छाननी वेळी शमशुद्दीन शेख - बळीराजा पार्टी,देवेश पाटील - अपक्ष,
विठ्ठल कांबळे - अपक्ष,वारस्मिया दादुमिया शेख- पिस पार्टी,मोहम्मद खान अक्रम - अपक्ष अशा पाच जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.