शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

By admin | Published: December 9, 2015 03:34 AM2015-12-09T03:34:11+5:302015-12-09T03:34:11+5:30

२००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा व विजय नकाशे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी,

Applying the old pension scheme to the teachers | शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

Next

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
नागपूर : २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा व विजय नकाशे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने मंगळवारी विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यात राज्यभरातील शेकडो शिक्षकांनी भाग घेतला होता. यातील मोर्चेकरी शिक्षकांनी सरकारविरूद्ध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
नेतृत्व
समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे-पाटील, सरचिटणीस उदय रामचंद्र शिंदे, कार्याध्यक्ष विजय कोंबे, शिवाजीराव साखरे, नाना जोशी, विश्वनाथ मिरजकर, भिवाजी कांबळे, किरण गायकवाड, महादेव माळवदकर, मनोज दीक्षित, सुधाकर सावंत, सुरेखा कदम, दादाजी सावंत, दीपक मेढेकर, अनिल मुलकनवार व सुरेखा कदम यांनी केले.
मागण्या
नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
आंतर जिल्हा बदलीकरिता राज्यस्तरीय रोस्टर तयार करावे.
पटसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करू नये.
जि. प. शिक्षक भरती करण्यापूर्वी आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढावीत.
प्राथमिक शाळेत डिजीटल क्लासरूम तयार करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी.
विषय शिक्षकांना नेमणूक देताना वेतनवाढ द्यावी.
सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळवा.
संगणक परीक्षेस मुदतवाढ मिळावी.
सर्व शाळांना वीज, पाणी मोफत मिळावे.
प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.

Web Title: Applying the old pension scheme to the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.