पालिकेच्या वैद्यकीय विभागात सुसूत्रता आणण्यासाठी दोन प्रभारींची नियुक्ती करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 07:36 PM2017-12-21T19:36:50+5:302017-12-21T19:37:05+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील व्याप्तीचा फायदा गैरमार्गाने घेतला जात असल्याचा प्रकार अलिकडेच प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या लाचखोरीमुळे उघडकीस आला आहे

Appoint two in-charge for co-ordination in the Medical Department of the Municipal Corporation; Commissioner of Deputy Mayor demand | पालिकेच्या वैद्यकीय विभागात सुसूत्रता आणण्यासाठी दोन प्रभारींची नियुक्ती करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे मागणी

पालिकेच्या वैद्यकीय विभागात सुसूत्रता आणण्यासाठी दोन प्रभारींची नियुक्ती करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे मागणी

Next

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील व्याप्तीचा फायदा गैरमार्गाने घेतला जात असल्याचा प्रकार अलिकडेच प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या लाचखोरीमुळे उघडकीस आला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने दोन प्रभारी मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली आहे. 

शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असुन नागरीकांच्या रुग्णसेवेवर ताण पडू लागला आहे. परंतु, हि रुग्णसेवा असमाधानकारक ठरु लागल्याने ती व्हेंटिलेटरवर येऊ लागली आहे. पालिकेकडुन सध्या १० प्राथमिक आरोग्य केंद्रांसह मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी व भार्इंदर येथील भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय चालविले जात आहे. यातील जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत होण्याच्या मार्गावर असले तरी त्यातील रुग्णसेवा सध्या पालिकेकडुन पुरविली जात आहे. परंतु, या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवा वाऱ्यावर आहे. याखेरीज रुग्णालयात अद्यावत साहित्य असतानाही रुग्णांना वैद्यकीय तपासण्या खाजगी प्रयोगशाळेत करुन घ्याव्या लागतात. हा कारभार वैद्यकीय विभागाकडुन चालविला जात असल्याने रुग्णसेवेसह डास निमुर्लन, लिंक वर्कर, बहुद्देशीय कर्मचारी, औषध व वैद्यकीय साहित्य पुरवठा, रुग्णालयातील नियुक्तया आदी वैद्यकीयसेवेशी निगडीत कामांचा व्याप सतत वाढू लागला आहे. त्याचा भार एकाच व्यक्तीकडे देण्यात येत असल्याने त्यात अनागोंदीचा शिरकाव होऊ लागला आहे. 

Web Title: Appoint two in-charge for co-ordination in the Medical Department of the Municipal Corporation; Commissioner of Deputy Mayor demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.