राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

By नितीन पंडित | Published: February 9, 2024 05:16 PM2024-02-09T17:16:28+5:302024-02-09T17:17:25+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आह

appointment of dr rupali karale as thane district president of nationalist women's congress | राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

नितीन पंडित, भिवंडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कराळे या यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा,राष्ट्रवादीच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीयाताई खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी डॉ.कराळे या प्रयत्नशील राहतील व पक्ष बळकटीसाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असा विश्वास यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच असलेल्या डॉ. रूपाली कराळे या हुशार व अभ्यासू असल्याने त्यांची राष्ट्रवादीच्या महिला जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी पार्टी अधिक सक्षम होणार आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी दिली आहे.

Web Title: appointment of dr rupali karale as thane district president of nationalist women's congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.