चौघा वारसांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती; आयुक्तांकडून नियुक्ती पत्र 

By धीरज परब | Published: March 11, 2023 01:57 PM2023-03-11T13:57:06+5:302023-03-11T13:57:29+5:30

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते ह्या चौघा जणांना नियुक्ती पत्र देण्यात आली .

Appointment of four heirs to Mira Bhayander Municipal Corporation; Appointment letter from Commissioner | चौघा वारसांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती; आयुक्तांकडून नियुक्ती पत्र 

चौघा वारसांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती; आयुक्तांकडून नियुक्ती पत्र 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत दिवंगत कमर्चाऱ्यांच्या ३ वारसांना व अनुकंपा तत्वावर एकास कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेत कायम स्वरूपी सेवेत असणारे अनेक सफाई कामगार निवृत्त होत आहेत . मात्र महापालिका मुख्यालया पासून शहरातील दैनंदिन साफसफाई साठी ठेकेदारा मार्फत सफाई कामगार नियुक्त  केले गेले आहेत . त्यामुळे पालिकेतील सफाई कामगारांची पदे मंजूर व अनेक रिक्त असली तरी काम नसताना नेमणूक करण्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते . परंतु  लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार निवृत्त सफाई कामगाराच्या जागी अनुकंपा तत्वावर त्याच्या वारसांना नियुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने  सेवानिवृत्त सफाई कर्मचारी प्रभाकर माने यांचे वारस प्रथमेश माने यांना सफाई कामगार या पदावर नियुक्त केले आहे . 

त्याच प्रमाणे मृत तिघा र्मचाऱ्यांच्या वारसांना देखील पालिका सेवेत सामावून घेण्यात आले . दिवंगत शिपाई शांताराम पाटील यांचे वारस प्राजक्ता पाटील यांना लिपीक पदावर, दिवंगत सफाई कामगार रामचंद्र भाईर यांचे वारस मयूर भोईर यांना मजूर पदावर तर दिवंगत सफाई कामगार काशिनाथ म्हात्रे यांचे वारस कुंदन म्हात्रे यांना शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते ह्या चौघा जणांना नियुक्ती पत्र देण्यात आली . यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Appointment of four heirs to Mira Bhayander Municipal Corporation; Appointment letter from Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.