परमबीर सिंग खंडणी प्रकरणाचा ठाणे पोलिसांच्या एसआयटीची नियुक्ती
By जितेंद्र कालेकर | Published: August 5, 2021 07:32 PM2021-08-05T19:32:27+5:302021-08-05T19:34:54+5:30
बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची या एसआयटीमार्फतीने चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.
मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता बिनू वर्गीस यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी हा खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी, पैसे वसूलीसाठी धमकावणे अशी गंभीर कलमे या गुन्हयांमध्ये आहेत. एरव्ही, एखादा पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडून अशा गुन्हयांचा तपास होतो. मात्र, यात अडकलेले पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयासह अनेक बडया अधिकाऱ्यांचा तसेच खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्यावर झालेले आरोपही गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळेच अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठीही एक दोन नव्हे तर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या टीमचीच आवश्यकता असल्याचा अभिप्राय काही वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे नोंदविला होता. याचीच दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या अधिपत्याखाली पाच अधिकारी आणि पाच कर्मचाºयांचा समावेश असलेली एसआयटी तपास करणार आहे. या टीमला गरज पडली तर इतरही पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांनी मदत करायची असल्याचे आयुक्तांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.