बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:26 AM2019-09-26T00:26:44+5:302019-09-26T00:27:17+5:30

प्रत्येक केंद्रावर व्यवस्था; निवडणूक यंत्रणेने दिली माहिती

Appointment of women at polling booths in Mumbai to identify the voters | बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

googlenewsNext

- कुमार बडदे 

मुंब्रा : मुस्लिमबहुल मुंब्य्रातील बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर विशेष महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

३१ आॅगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या मतदारयादीनुसार, या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख ५१ हजार २८४ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ६० हजार ६९४ महिला, तर एक लाख ९० हजार ५९० पुरु ष मतदार आहेत. सशस्त्र दलातील मतदारांची संख्या ८५, तर दिव्यांग मतदारांची संख्या ६० आहे. मतदानासाठी ७१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, कळव्यातील १७७ तसेच मुंब्य्रातील १७६ आणि साहाय्यकारी अशा एकूण ३५५ केंद्रांवर मतदान होणार आहे. कळव्यातील मनीषानगरमधील एक मतदान केंद्र महिला संचालित करणार आहेत. निवडणुकीशी सर्व संबंधित कामे कौसा परिसरातील श्री मौलाना अबुल कलाम आझाद क्र ीडा संकुलामध्ये होणार असून, मतदानयंत्रे ठेवण्यासाठी येथेच स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन कोर्टाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रे तळमजल्यावर आहेत. मतदानापूर्वी काही दिवस आधी ३४५ बुथ लेव्हल आॅफिसर्स मतदारांच्या नावाच्या स्लिप मतदारांच्या घरी पोहोचवल्या जाणार आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॅली, रोड शो, प्रचारसभा आदी निवडणूक आयोगाशी संबंधित परवाने लवकरात लवकर देण्यासाठी मुख्य कार्यालयाच्या परिसरात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

शासकीय इमारतीवर प्रचार साहित्य लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रि या सुरळीत आणि मोकळ्या वातावरणात पार पडावी, यासाठी संभाव्य उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच पोलीस अधिकाºयांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी येणाºयांना हवी असलेली माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मदतकेंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती देऊन, मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी यावेळी केले.

Web Title: Appointment of women at polling booths in Mumbai to identify the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.