उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य विभागाचे कौतुक; बाळू नेटके यांच्यामुळे वाचला १३५ जणांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:49 PM2021-08-16T19:49:33+5:302021-08-16T19:51:28+5:30

उल्हासनगर महापालिका कारभारावर नेहमीची झोळ उठत असताना, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Appreciation of Fire Department and Health Department of Ulhasnagar Municipal Corporation | उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य विभागाचे कौतुक; बाळू नेटके यांच्यामुळे वाचला १३५ जणांचा जीव

उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य विभागाचे कौतुक; बाळू नेटके यांच्यामुळे वाचला १३५ जणांचा जीव

googlenewsNext

उल्हासनगर: महापालिका आरोग्य विभाग हेल्थ केअर होरोज ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित झाला आणि यानंतर अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यामुळे दोन्ही विभागाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सतर्कतेमुळे मेहक इमारतीमधील १३५ जनाचा जीव वाचला होता. (Appreciation of Fire Department and Health Department of Ulhasnagar Municipal Corporation)

उल्हासनगर महापालिका कारभारावर नेहमीची झोळ उठत असताना, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णलाय नसतांना, शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णलाय ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच भिवंडी येथील आमंत्रण इमारतीसह रेडक्रॉस हॉस्पिटल, आयटीआय कॉलेजची इमारत, तहसिलदार कार्यालयाची इमारत, वेदांत कॉलेज इमारत, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, महापालिका शाळा ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णाच्या संख्येत वाढ होताच महापालिकेने खाजगी साई प्लॅटिनियम भाडेतत्वावर घेऊन शेकडो कोरोना रुग्णांना जीवदान दिले. अपुरा डॉक्टर वर्ग असतांना विभागाने चांगले काम केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे व वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. विभागाच्या कामाची दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाला हेल्थ केअर हिरोज ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाच्या पाठोपाठ अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन दलाचे प्रमुख पंकज पवार, स्टेशन मास्टर संदीप आसेकर व राजेंद्र राजन याना स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यानंतर, दोन्ही विभागाच्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. २०१९ मध्ये कॅम्प नं-३ लिंक रोडवरील पाच मजल्याच्या मेहक इमारतीचे दरवाजे सकाळी ८ वाजण्याच्यादरम्यान उघडत नसल्याने, नागरिकांनी अग्निशमन दल विभागाला माहिती दिली. विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील २५ कुटुंबातील १३५ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच इमारत केंव्हाही पडण्याची शक्यता व्यक्त करून राहिवाशी नागरिक व राजकीय दबाव असताना इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला. दुसऱ्या दिवशी सकाळी इमारत कोसळली. अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांच्यासह सहकाऱ्यांमुळे तब्बल १३५ जणांचे जीव वाचले होते. 

महापालिका विभागाचे सर्वत्र कौतुक 
अग्निशमन दलाचे राष्ट्रपती शौर्य पदक विजेते अधिकारी बाळू नेटके, पंकज पवार, संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा स्वातंत्र दिनी महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शहरातही त्यांचे कौतुक व सत्कार होत आहे, तसेच आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे यांचे कौतुक होत आहे.
 

Web Title: Appreciation of Fire Department and Health Department of Ulhasnagar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.