मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या
By सुरेश लोखंडे | Published: January 27, 2024 04:46 PM2024-01-27T16:46:32+5:302024-01-27T16:48:22+5:30
१४१४१८ कुटुंबांचे सर्वेक्षण तीन दिवसात पूर्ण !
सुरेश लोखंडे,ठाणे : जिल्हयात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या नाेंदी शाेधण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, सह निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावर कुणबी नोंदी शोध मोहीम सुरु आहे. त्याव्दारे आजपयंत एक लाख ३६ हजार १०१ नाेंदी आढळून आलेल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षण माेहिमेत गेल्या काही दिवसात एक लाख ४१ हजार ४१८ कुटुंबियांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठा समाज समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमृर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये सन १९६७ पूर्वीच्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधणे तसेच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, संबंधित व्यक्तिंना जात प्रमाणपत्राचे वाटप करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे अभिलेख नाेंदी शाेधण्या असता त्याव्दारे एक लाख ३६ हजार १०१ नाेंदी ठिकठिकाणी आढळल्या आहेत. यापैकी ठाणे तालुक्यात नऊ हजार ४६२, भिवंडीला २५ हजार ६५४,, कल्याणला आठ हजार ५६४, उल्हासनगरला ३६, अंबरनाथला एक हजार १८५, शहापूरला ५८ हजार ३७४, मुरबाड तालुक्यात ३२ हजार ८१४, आणि मीरा-भाईंदर परिसरात अवघ्या आठ अभिलेख नाेंदी आढळून आलेल्या आहेत. या एक जाख ३६ हजार १०१ अभिलेख नाेंदी तालुका स्तरावर स्कॅनिंग करुन ठाणे जिल्हयातील www.nic.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत.
ज्या माडी माषेमध्ये नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांचे ही भाषांतर करुन वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. आढळलेल्या नोंदीची यादी तालुक्यातील गावनिहाय ग्रामपंचायतींमध्ये प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरु आहे. २४ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण तीन हजार ५४२ कुणबी दाखले उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना देण्यात आले आहेत. ज्या गावात कुणबी नोंदी आढळल्या आहेत अशा गावांच्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करुन दाखले वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यात एकूण तीन हजार १६४ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक असे एकूण तीन हजार ४२२ कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त आहेत. आयोगाच्या सूचनांनुसार तालुकास्तरीय नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांमार्फत २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लाख ९४ हजार २८ कुटुंबांपैकी २५ जानेवारीपर्यंतची १ लाख ४१ हजार ४१८ (२८.६३ टक्के) कुटुंबांचे सर्वेक्षण तीन दिवसात पूर्ण झाले आहे आहे. या सर्वेक्षणाची तालुकानिहाय संख्यात्मक माहिती व टक्केवारी खालील प्रमाणे -
तालुका:- कार्यरत प्रगणक - एकूण कुटूंब -सर्वेक्षण झालेलेी कुटूब - टक्केवारी
ठाणे - ४५ ७०७३ १ २५१, १७.६९
भिवंडी - ८३३ १५९३६९ ३४७२० २१.७९
अंबरनाथ - १०२४ १८८३४९ ४६७७० २४.८३
शहापूर - ५५३ ५३२८६ १३५२७ २५.३९
मुरबाड - ४५४ ५०३५४ ३१४०० ६२.३६
कल्याण - २६३ ३५५९७ १३७५० ३८.६३