मीरा-भाईंदरमध्ये फटाके विक्रेत्यांच्या फायद्यासाठी महापालिकेचे मनमानी परवाने; शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या आई-वडिलांसह रहिवाश्यांनी केला विरोध
By धीरज परब | Published: October 20, 2022 06:54 PM2022-10-20T18:54:25+5:302022-10-20T18:55:09+5:30
Mira-Bhayander: मिरा भाईंदर मध्ये गल्ली बोळात वाट्टेल तिकडे फटाके स्टॉल यंदा थाटलेले असून अनेक स्टॉल ना परवानगी नाही तर पालिकेने दिलेली काहींना दिलेली परवानगी सुद्धा दरवर्षी प्रमाणेच नियम बासनात गुंडाळून दिल्याने संताप व्यक्त होत आहे .
मीरारोड - न्यायालयाने दिलेले आदेश , ध्वनी व वायू प्रदूषण, स्फोटाचा धोका , वाहतूक कोंडी आदींचा गांभीर्याने विचार फटाके स्टॉल बाबत पालिका , पोलिसांनी करणे अपेक्षित आहे . परंतु मिरा भाईंदर मध्ये गल्ली बोळात वाट्टेल तिकडे फटाके स्टॉल यंदा थाटलेले असून अनेक स्टॉल ना परवानगी नाही तर पालिकेने दिलेली काहींना दिलेली परवानगी सुद्धा दरवर्षी प्रमाणेच नियम बासनात गुंडाळून दिल्याने संताप व्यक्त होत आहे . शीतल नगर येथूल उद्यानात पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या फटका स्टॉल विरोधात तर शहिद मेजर यांच्या आई - वडिलांना रहिवाश्यांसह रस्त्यावर उतरावे लागले.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर शासनाने देखील फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या पटांगणात देण्याचे तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारती मध्ये फटाके विक्रीस परवाने देऊन नये आदी आदेश दिलेले आहेत . भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचने नुसार फटाक्यांच्या विक्रीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या कडून परवानगी हवी . स्टोल बंदिस्त हवा व दोन स्टॉल मध्ये किमान ३ मीटर अंतर हवे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर राज्य शासनाने देखील फटाका विक्री व साठवणूक साठी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी , निवासी इमारतीत परवानगी देऊ नये . मोकळ्या मैदान वा पटांगणात परवानगी द्यावी . बेकायदा फाटकी विक्री वा साठवणूक वर तात्काळ कारवाई करावे असे स्पष्ट केले आहे.
तसे असताना मीरा भाईंदर शहरात उघडपणे लोकांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रस्ता व पदपथ लगत फटका स्टॉल लागलेले आहेत. अनेकांना परवानगी मिळालेली नसताना देखील फटाके स्टॉल उभारण्यात आले आहे . संतापाची बाब म्हणजे महापालिका , अग्निशमन दल व पोलीस हे चक्क रस्त्या लगत गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी शासन व उच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून लोकांच्या जीवाशी खेळ करत फटाके विक्रेत्यांना परवानग्या देत आहे.
फटाके हे अतिशय स्फोटक ज्वलनशील असल्याने या आधी फटाक्यां मुळे मोठ्या जीवघेण्या दुर्घटना घडलेल्या आहे . परंतु महापालिका वा पोलिसांना नागरिकांच्या जिवा ऐवजी फटाके विक्रेत्यांचे गल्ले भरले जावेत याची जास्त काळजी आहे.
मीरारोडच्या शीतल नगर मध्ये तर शहिद उद्यानात महापालिकेने फटाका स्टॉल ना परवानगी देऊन वादाला तोंड फोडले आहे . गृहसंकुलाच्या आरजी ची जागा असताना रहिवाश्याना न जुमानता महापालिकेने तेथे फटाका स्टॉल ना परवानगी दिली व विक्रेत्याने बळजबरी उद्यानात जाऊन स्टॉल सुद्धा उभारला . त्यामुळे स्थानिक रहिवाशी असलेले शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश यांनी अन्य रहिवाश्यांसह उद्यानाच्या बाहेर धरणे धरले . पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी घटना स्थळी जाऊन त्यांची समजूत काढली व नंतर स्टॉल हटवण्याचे निर्देश दिले.
वास्तविक रहिवाश्यांच्या हक्काचा आरजी भूखंड असताना कोणी सौम्य गोम्या उठतो आणि आपली जमीन सांगून फटाका स्टॉल ना परवानगी देत असेल तर ते खपवून घेणार नाही असे रहिवाश्यानी व आम आदमी पक्षाच्या सुखदेव बिनबंसी आदींनी सांगितले . तर रहिवाश्याना नवरात्री साजरी करण्यास विरोध केला जातो मात्र खाजगी व्यक्तीच्या आर्थिक फायद्यासाठी फटाका स्टॉल ना परवानगी मिळते हे संतापजनक असल्याचे माजी नगरसेवक राजीव मेहरा यांनी सांगितले .