भांडणात मध्यस्थी भोवली: तरुणावर चौघांचा लोखंडी रॉडसह कोयत्याने खूनी हल्ला

By जितेंद्र कालेकर | Published: December 26, 2023 09:06 PM2023-12-26T21:06:54+5:302023-12-26T21:07:08+5:30

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: हल्लेखोर पसार

Argument over interference : Youth brutally attacked by four with iron rod | भांडणात मध्यस्थी भोवली: तरुणावर चौघांचा लोखंडी रॉडसह कोयत्याने खूनी हल्ला

भांडणात मध्यस्थी भोवली: तरुणावर चौघांचा लोखंडी रॉडसह कोयत्याने खूनी हल्ला

ठाणे: दोघांच्या भांडणामध्ये मध्यस्ती केल्याच्या रागातून राजू रवानी (२८, रा. लोकमान्यनगर, पाडा क्रमांक ४, ठाणे) या केबल व्यावसायिकावर अभिषेक सिंग, कमल सिंग, योगेश मिश्रा आणि राम दुबे या टोळक्याने लोखंडी सळई आणि कोयत्याने खूनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी दिली. 

अभिषेक सिंग याने २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कॉल करुन शास्त्रीनगर, वर्तकनगर भागात हिमांशु ठाकूर याच्यासोबत बोलणी करण्यासाठी बोलवले होते. त्यामुळे राजू रवानी हा त्याचा मित्र रोशन बद्रे आणि सनी जाधव यांच्यासह शास्त्रीनगर भागात गेले. त्यावेळी कमल सिंग व अभिषेक हे त्याठिकाणी त्यांचे अन्य दोन मित्र राम दुबे आणि योगेश मिश्रा यांच्यासह होते. विषय वाढवू नका, मिटवून टाका,असा सल्ला राजू याने अभिषेकला दिला.

हे सांगत असतांनाच योगेश मिश्रा याने त्याला शिवीगाळ करुन हाताने श्रीमुखात लगावली. त्याचा प्रतिकार करतांनाच राम दुबे याने लोखंडी कोयता त्याच्यावर उगारला. यात त्याच्या डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली. यात तो खाली पडला. योगेश मिश्रा यानेही त्याच्याकडील लोखंडी सळईने उजव्या पायावर मारहाण केली. राजूसोबत असलेल्या रोशन व सनी यांनी आरडाओरडा केल्याने हे चौघेही हल्लेखोर तिून पळून गेले. त्यानंतर राजूचा मित्र  आणि भाऊ संजय यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चौष्घांविरुद्ध २५ डिसेंबर रोजी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Argument over interference : Youth brutally attacked by four with iron rod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.