उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:15 PM2021-05-04T23:15:53+5:302021-05-04T23:22:21+5:30
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नोंदणीही केली आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नोंदणीही केली आहे. संपूर्ण ठाणे आयुक्तालयातून स्वयंसेवकांची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना वाहतुकीच्या नियंत्रणाबरोबरच वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी लागत आहे. सध्या वाहतूक नियमनासाठीच या विभागाची कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळेच ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण या उपक्रमांतर्गत ज्या नागरिकांना वाहतूक शाखेसाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याची इच्छा आहे त्यांना ही सेवा देण्याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते. ठाणे आणि उल्हासनगरमध्ये वाहतूक शाखेने आवाहन करण्यापूर्वीच काही नागरिक स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. आता आवाहनानंतर उल्हासनगरमध्ये ४० शिक्षकांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत (आरएसपी) स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. आणखीही काही शिक्षकांसह नागरिक वाहतूक स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढे येत आहेत. उल्हासनगरबरोबरच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या चार विभागांमधील १८ युनिटमध्ये अशी नोंदणी सुरू आहे. किमान ४०० ते ५०० स्वयंसेवकांची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे.
काय असणार उपक्रम...
वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षेसंदर्भात स्थानिक पातळीवर जनजागृती, वाहतूक नियमनासाठी आठवड्यायातील किमान दोन तास वाहतूक शाखेला मदत करणे तसेच लोकसहभागातून वाहतूक नियमन व शिस्त राबविणे तसेच समाजाभिमुख कार्याची जाणीव निर्माण करणे हे काम हे स्वयंसेवक करणार आहेत.
* नोंदणीसाठी प्रक्रिया
वाहतूक स्वयंसेवक या संकल्पनेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे. त्यानंतर त्यांनी सलग सहा महिने सेवा बजावल्यानंतर त्यांचा गौरव केला जाणार आहे.
सध्या उल्हासनगरमध्ये ४० शिक्षकांनी स्वयंसेवकासाठी तयारी दर्शविली आहे. इतरही ठिकाणी ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती पूर्ण होईल.
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर