सेना नगरसेविकांचा 'केडीएमसी'त गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 05:00 AM2017-08-02T05:00:30+5:302017-08-02T05:00:38+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू हे सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांची नव्हे, तर राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची कामे करतात
Next
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू हे सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांची नव्हे, तर राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची कामे करतात, असा आरोप करीत, शिवसेनेच्या नगरसेविकांनी मंगळवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी केली. बंद दालनाच्या दरवाजांवर लाथा मारणे, शिवीगाळ करणे आणि खुर्च्यांची मोडतोड असा धिंगाणा या नगरसेविकांनी घातला.