म्युकरमोयकोसिसचा सामना करण्यासाठी पालिकेत तज्ज्ञ डॉक्टरांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 04:19 PM2021-05-22T16:19:50+5:302021-05-22T16:20:24+5:30

कोरोना पाठोपाठ आता ठाण्यासह जिल्ह्यात म्युकरमोयकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६४ रुग्ण आढळले असून त्यातील ८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

An army of expert doctors in the municipality to combat mucomyocosis in thane | म्युकरमोयकोसिसचा सामना करण्यासाठी पालिकेत तज्ज्ञ डॉक्टरांची फौज

म्युकरमोयकोसिसचा सामना करण्यासाठी पालिकेत तज्ज्ञ डॉक्टरांची फौज

Next

ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात म्युकरमोयकोसिस आजाराचे ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. परंतु, संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने या आजाराला रोखण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत या उद्देशाने तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया आदींची कंत्रटी स्वरुपात भरती केली जाणार आहे. तसेच कळवा रुग्णालयातील एक वॉर्डही यासाठी सज्ज केला जात असल्याची माहिती पालिकेने दिली.

कोरोना पाठोपाठ आता ठाण्यासह जिल्ह्यात म्युकरमोयकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६४ रुग्ण आढळले असून त्यातील ८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु आता या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता, ठाणे महापालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. तसेच कळवा रुग्णालयातही यासाठी एक वॉर्ड राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यानुसार याठिकाणी सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली आहे. 

येथील डॉक्टरांना देखील तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ओपीडीवर येणा:या प्रत्येक रुग्णाची योग्य पध्दतीने तपासणी सुरु झाली आहे. औषधांची जुळवा जुळव करण्याची तयारी, इतर सामुग्री मागविली जात आहे. येत्या सात ते आठ दिवसात ही यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णाला दोन आठवड्यांचा कालावधी जात आहे. त्यासाठी कळवा रुग्णालयात कान, नाक, घसा, फिजीशिएन, न्युरोलॉजीस्ट आहेत. तसेच जे डॉक्टर नाहीत, त्यांची उपलब्धता केली जाणार आहे.

दरम्यान, त्यानुसार आता ठाणो महापालिकेने देखील या संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉक्टर, नर्सेची फौज उभी करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ८४ जणांचा स्टाफ हा कंत्रटी स्वरुपात उभा केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. यामध्ये एमडी मेडीसीन तज्ञ ०३, एमडी अनेस्थेशिया - एमडी मेडीसीन ०४, एमडी ऑपथोलॉन ०१, एमडीएस तज्ञ ०१, एमडी न्युपरोलॉजीस्ट ०२, ईएनटी सजर्न ०१, एमडी अनेस्थेशिया ०१, स्टाफ नर्स ४०, ओटी अटेंडन्स ०४, वॉर्डबॉय, आया - १२ आणि सफाई कामगार १५ अशी पदे कंत्रटी स्वरुपात भरली जाणार आहेत.
 

Web Title: An army of expert doctors in the municipality to combat mucomyocosis in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.