डंपिंग प्रश्नावर सेना नगरसेवकाचा राजीनामा

By admin | Published: July 16, 2016 01:53 AM2016-07-16T01:53:17+5:302016-07-16T01:53:17+5:30

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले

Army resignation councilor on dumping question | डंपिंग प्रश्नावर सेना नगरसेवकाचा राजीनामा

डंपिंग प्रश्नावर सेना नगरसेवकाचा राजीनामा

Next

कल्याण : आधारवाडी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येत्या दीड वर्षात सुटणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी हा प्रश्न दीड वर्षात काय येत्या पाच वर्षात सुटणार नसल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे दै. ‘लोकमत’च्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात जाहीर केले. इतके नाही तर पाच वर्षांत हा प्रश्न सुटला तर राजकारणातून संन्यास घेईन, असेही जाहीर केले.
‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. ‘आधारवाडी डंपिंग ग्राऊंड समस्या आणि उपाय’ या स्थानिकांच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या विषयावरील या चर्चासत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डम्पिंगचा त्रास क्षणोक्षणी सहन करणारे नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी केडीएमसीचे अधिकारी आणि नगरसेवक उगले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे उगले यांनी थेट आपल्या राजीनाम्याची घोषणाच केली.
या चर्चासत्राला महापालिकेचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, ज्येष्ठ वकील शांताराम दातार, डॉ. नितीन बावस्कर आणि घनकचरा व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक श्रीकृष्ण भागवत आणि नगरसेवक उगले हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दै. लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे यांनी उपायुक्त तोरस्कर यांना प्रश्न विचारला की, डंपिंग ग्राऊंड हटविले जावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. मात्र ते हटविण्याची प्रक्रिया अद्याप का पूर्ण केली जात नाही.
प्रशासनाकडून इतक्या मंदगतीने कार्यवाही का सुरु आहे. नक्की डंपिंग ग्राऊंड कधी बंद होणार आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल. त्यावर तोरस्कर यांनी डंपिंग ग्राऊंड हटविण्यासाठी प्रशासनाकडून शंभर टक्के प्रयत्न सुरु आहे. येत्या दीड वर्षात हे डंपिंग ग्राऊंड हटविण्याची प्रक्रिया केली जाईल. बायोगॅस आणि गांडूळ खताच्या प्रकल्पाचा उल्लेख त्यांनी केला. त्या जागेवर बाग फुलविली जाणार असल्याची ग्वाही दिली. यावर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करीत त्यांचा महापालिकेच्या विरोधातील रोष व्यक्त केला. अनेकांनी संतप्त सूरात प्रश्नांची सरबत्ती केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दै. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि उप सरव्यवस्थापक राघवेंद्र शेठ यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.

तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांनी गेली १४ वर्षे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर बेकायदा कचरा टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती दिली व कायद्याच्या या उल्लंघनाकरिता महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरले. घनकचरा व्यवस्थापनतज्ज्ञ श्रीकृष्ण भागवत यांनी कचरा तुम्ही निर्माण करता त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही आपलाही जबाबदारी आहे. प्रशासनावर जबाबदारी टाकून नामानिराळे राहता येणार नाही, अशा शब्दांत नागरिकांचे कान टोचले तर डॉ. नितीन बावस्कर यांनी डम्पिंगशेजारी राहणाऱ्यात श्वसनाचे व त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची माहिती दिली.

Web Title: Army resignation councilor on dumping question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.