सेना स्वबळावर लढणार, युती करण्यास वरिष्ठांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:19 AM2020-03-06T01:19:15+5:302020-03-06T01:19:22+5:30

विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असणारी शिवसेना आगामी पालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातून लढण्यास उत्सुक होती.

Army will fight on its own, senior opposition to coalition | सेना स्वबळावर लढणार, युती करण्यास वरिष्ठांचा विरोध

सेना स्वबळावर लढणार, युती करण्यास वरिष्ठांचा विरोध

Next

पंकज पाटील 
बदलापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असणारी शिवसेना आगामी पालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातून लढण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात आमदार किसन कथोरे यांनीही अनुकूलता दर्शवली होती. मात्र, राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा फटका हा बदलापूरमध्ये युतीलाही बसणार आहे. स्थानिक नेत्यांनी युतीबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांकडे शब्द टाकल्यावर त्यांना युतीबाबत स्पष्ट नकार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बदलापूर पालिकेच्या राजकीय वर्तुळात केवळ युतीचीच चर्चा आहे. गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आपली ताकद आजमावली होती. यंदा विधानसभा निवडणुकीत युतीमधील दुरावा कमी झाला होता. त्यामुळे बदलापूरमधील शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती करण्याचा प्रस्ताव होता.
यासंदर्भातील प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठांनी युतीबाबत अनुकूलता दर्शवली नाही. अप्रत्यक्षपणे युतीला नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जे दोन पक्ष एकत्रित निवडणूक लढविणार होते तेच दोन पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष हा दोन्ही पक्षांपैकी एका पक्षासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
>युतीची शाश्वती कुणीच देत नाही
राष्ट्रवादीने सुरुवातीला स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, आता राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी भाजपाकडेही बोलणी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत कोणत्या पक्षाची युती होणार, याची शाश्वती कोणीच देताना दिसत नाही.

Web Title: Army will fight on its own, senior opposition to coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.