सेनेचा युवा नेता गोल्डन गँगचा सूत्रधार, नागरिकांनी धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:58 AM2017-11-20T02:58:55+5:302017-11-20T02:59:36+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कामे खोळंबून ठेवणा-या, काम करणा-या अधिका-याला टिकून देणा-या, प्रत्येक कामात आपला हिस्सा वसूल करणा-या गोल्डन गँगचा सूत्रधार हा शिवसेनेच्या युवा नेता असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शनिवारी केला.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कामे खोळंबून ठेवणा-या, काम करणा-या अधिका-याला टिकून देणा-या, प्रत्येक कामात आपला हिस्सा वसूल करणा-या गोल्डन गँगचा सूत्रधार हा शिवसेनेच्या युवा नेता असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शनिवारी केला.
पत्रकारांनी या गोल्डन गँगची नावे जाहीर करावीत, असे खुले आव्हान नागिरकांनी दिले. पण त्यावेळी सत्ताधाºयांसह विरोधकांची बोलती बंद झाल्याने सभागृहात एकच जल्लोष झाला. या गँगची पालिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर पोटे यांनी महापौरांनी शिवसेनेच्या युवा नेत्याची झाडाझडती घ्यावी आणि चौकशी करावी. त्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे जाहीर करून टाकले. विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले, आम्हालाही चौकशी हवी आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमावी. त्यावर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेत ‘ठिक आहे’, एवढीच प्रतिक्रिया दिली.
खड्डयात गेलेले रस्ते, बेकायदा बांधकामांचे वाढलेले स्तोम आणि आरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा, या मुद्द्यांवर नागरिकांनी सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले. निमित्त होते पत्रकार संघाच्या ‘आमने-सामने’ कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाला प्रशासनाचे प्रमुख म्हणुन आयुक्त पी. वेलरासू यांनाही आमंत्रित केले होते. परंतु ते आले नाहीच. तसेच त्यांच्यावतीने कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. केडीएमसीतील शिवसेना- भाजपच्या सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘पंचनामा शहर विकासाचा’ असे या कार्यक्र माचे स्वरूप होते. त्यात महापौर राजेंद्र देवळेकर (शिवसेना), उपमहापौर मोरेश्वर भोईर (भाजपा), विरोधी पक्षनेते मंदार हळबे (मनसे), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे असे सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते.
२०१५ च्या महापालिका निवडणुकीत दिलेली आश्वासने, दोन वर्षातील कारभार आणि विकासकामे, शहरातील भेडसावणाºया समस्या, शिवसेना-भाजपामधील श्रेयवाद आदी विषयांवर सवाल करून पत्रकारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना बोलते केले. लोकप्रतिनिधींना ताळ््यावर आणायचे असेल तर असे कार्यक्रम वेळोवेळी घेण्याची मागणी केली.
>... आणि सभागृह हेलावले
उपस्थित नागरिकांनी सत्ताधाºयांना रस्ते, खड्डे, बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडी, फेरीवाले आदी मुद्द्यांवरून खडसावून जाब विचारला. वॉटर-मीटर-गटर या पलिकडे लोकप्रतिनिधींनी कामेच केली नाहीत, असा आक्षेप घेतला. २७ गावे वेगळी करा, अशी मागणी केली. पालिकेच्या रूक्मिणीबाई
रु ग्णालयातील भोंगळ कारभार आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाच्या मुद्द्यांंवरही सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्यात आले. ठाकुर्ली येथील एका महिलेने वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि सारे सभागृह स्तब्ध झाले. महापालिकेसह शहरातील इतर रूग्णालयांमध्ये फिरूनही योग्य उपचार मिळत नसतील तर काय करायची आहे ती स्मार्ट सिटी? या त्यांच्या प्रश्नावर सारे नेते निरु त्तर झाले.
>भाजपाचा महापौर झाला तर...
कल्याणचे रूक्मिणीबाई रु ग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा ठराव आम्ही संमत केला आहे. परंतु सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याचा ठपका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ठेवला. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते, त्यावर बोलताना उपमहापौर भोईर यांनी त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याने काही दिवसात ही कामे पहावयास मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेची सत्ता असतानाही कल्याण- डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी आणण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते हळबे यांनी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी आघाडी सरकारच्या काळात कल्याण-डोंबिवलीत मोठया प्रमाणात निधी आला. त्यातून अनेक कामे झाल्याचे सांगितले.
अपुºया सुविधांवरून राष्ट्रवादीचे डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांनीही जोरदार टीका केली. जर भाजपचा महापौर बसला तर विकासनिधी मोठया प्रमाणावर येईल आणि त्याचे सर्व श्रेय भाजपा घेईल, यावरही विरोधकांचे एकमत झाल्याचे पहावयास मिळाले.