Arnab Goswami: राज्य सरकारविरोधात ठाण्यात भाजपाची तीव्र निदर्शने; अन्यायकारक निर्णयांविरोधात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:35 PM2020-11-04T14:35:42+5:302020-11-04T14:35:49+5:30

आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. 

Arnab Goswami: BJP protests in Thane against state government; Declaration against unjust decisions | Arnab Goswami: राज्य सरकारविरोधात ठाण्यात भाजपाची तीव्र निदर्शने; अन्यायकारक निर्णयांविरोधात घोषणा

Arnab Goswami: राज्य सरकारविरोधात ठाण्यात भाजपाची तीव्र निदर्शने; अन्यायकारक निर्णयांविरोधात घोषणा

Next

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या अन्यायकारक निर्णयांबरोबरच पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात असल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी झालेल्या निदर्शनांवेळा जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार हाय हाय, सोनिया सेना हाय हाय, नही चलेगी तानाशाही नही चलेगीच्या घोषणांनी कोर्टनाक्याचा परिसर दणाणून गेला. या निदर्शनांध्ये भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, अर्चना मणेरा, दीपा गावंड, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, युवा मोर्चाचे सारंग मेढेकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह ठाण्यातील लोकशाहीप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

राज्यातील जनतेवर अन्याय करणाऱ्या निर्णयांची मालिका राज्य सरकारकडून सुरूच असून, राज्यातील जनतेची गळचेपी केली जात आहे. राज्य सरकारचे पाप जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांना सातत्याने दाबण्याचे कृत्य केले जात आहे. सातत्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. अशा प्रकारांमधून राज्य सरकार आणीबाणी लागू करीत आहे, असा आरोप आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला. 

देशात १९७५ मध्ये कॉंग्रेसने जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी आणीबाणी आणली होती. त्याचीच आता राज्य सरकार, सोनिया गांधी व ठाकरे सरकार री ओढत आहेत. लोकशाही व संविधानाचे पालन न करता सूडभावनेने राज्य सरकार वागत आहे. यापुढील काळात लोकशाही टिकविण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

Web Title: Arnab Goswami: BJP protests in Thane against state government; Declaration against unjust decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.