९५ हजार ३६० विद्यार्थ्यांची व्यवस्था

By admin | Published: June 11, 2017 03:17 AM2017-06-11T03:17:49+5:302017-06-11T03:17:49+5:30

जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ८५० विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली असून ते निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या ९५ हजार ३६०

Arrangement of 95 thousand 360 students | ९५ हजार ३६० विद्यार्थ्यांची व्यवस्था

९५ हजार ३६० विद्यार्थ्यांची व्यवस्था

Next

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ८५० विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली असून ते निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या ९५ हजार ३६० विद्यार्थ्यांचा कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेतील अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांचा १०० टक्के निकाल लागला, तर २६ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल.
जिल्ह्यात सिनिअर-ज्युनिअर आदी सुमारे २६१ महाविद्यालये विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश देण्यासाठी सज्ज आहेत. या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी ३२ हजार ७८० जागा उपलब्ध आहेत, तर ४९ हजार ५३० वाणिज्य शाखेच्या जागा आहेत. याशिवाय, कला शाखेच्या १३ हजार ५० जागा आहेत. केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातील ८९ महाविद्यालयांमध्ये २४ हजार ४८० जागा उपलब्ध आहेत. यापैकी विज्ञान शाखेच्या आठ हजार ७२०, वाणिज्य शाखेच्या ११ हजार ९२० व कला शाखेच्या तीन हजार ८४० जागा आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ७३ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध एकूण २६ हजार ६६० जागांपैकी विज्ञान शाखेच्या आठ हजार ४०, वाणिज्य शाखेच्या १३ हजार ८४० आणि कला शाखेच्या चार हजार ७८० जागा आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील ३१ महाविद्यालयांत एकूण १६ हजार ८०० जागा आहेत. यातील विज्ञानच्या ५ हजार ८०, वाणिज्यच्या ९ हजार २०० आणि कलाच्या २ हजार ५२० जागा आहेत. विद्यार्थ्यांना तीन ते १० महाविद्यालये सुचवायची आहेत.
मागील वर्षीची ‘कट आॅफ लिस्ट’
ठाणे-बांदोडकर महाविद्यालय, विज्ञान शाखा, खुला प्रवर्ग (४५५ गुण), जोशी-बेडेकर महाविद्यालय, वाणिज्य (४२९ गुण), ज्ञानसाधना विज्ञान (२२८ गुण), एनकेटीत (४१६ गुण), जॉन बाप्टीस्ट (४४२ गुण), ब्राह्मण शिक्षण मंडळ (३०४ गुण).
डोंबिवली- पेंढरकर महाविद्यालय, विज्ञान शाखा, खुला प्रवर्ग (४९६ गुण), मॉडेल महाविद्यालय (३९७ गुण), जोंधळे महाविद्यालय (४३० गुण).
कल्याण- बिर्ला महाविद्यालय, विज्ञान शाखा, खुला प्रवर्ग (४५० गुण), वाणिज्य शाखा (३९० गुण) के.एम. अग्रवाल महाविद्यालय, वाणिज्य शाखा (३३८ गुण) विज्ञान शाखा (४१० गुण).


अकरावीची मार्गदर्शन केंद्रे
- आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घ्यावा लागणार आहे. उत्तीर्ण होणारा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने खबरदारी घेतली आहे.
- जिल्हाभरात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आदी ठिकाणी एकूण १४ मार्गदर्शन केंदे्र सुरू होेणार आहेत.

Web Title: Arrangement of 95 thousand 360 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.