पादचारी मार्गावर तब्बल पाऊण किमी लांबीची शेड उभारून पंखे, बेंच आदींची व्यवस्था मात्र स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By धीरज परब | Published: October 15, 2023 05:53 PM2023-10-15T17:53:30+5:302023-10-15T17:53:48+5:30

रहिवाश्यांनी हि शेड काढून टाकण्याची मागणी पालिके कडे केली आहे .

arrangement of fans, benches, etc. by erecting a shed of about a quarter of a kilometer on the footpath, but the safety of the local residents is at stake. | पादचारी मार्गावर तब्बल पाऊण किमी लांबीची शेड उभारून पंखे, बेंच आदींची व्यवस्था मात्र स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर

पादचारी मार्गावर तब्बल पाऊण किमी लांबीची शेड उभारून पंखे, बेंच आदींची व्यवस्था मात्र स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर

मीरारोड- भाईंदर पश्चिमेच्या तब्बल पाऊण किमी लांबीच्या  पादचारी मार्गावर चक्क प्लॅस्टिकची शेड उभारून आत पंखे , बसायचे बाकडे , दिवे लावण्याचे काम महापालिकेने केले . मात्र हेच काम येथील रहिवाश्यांच्या सुरक्षिततेवर बेतले आहे . रहिवाश्यांनी हि शेड काढून टाकण्याची मागणी पालिके कडे केली आहे. 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे समांतर गल्ली आहे . त्यावरून काही हजार लोक रोजची ये जा करत असतात . येथील मधू अग्रवाल रुग्णालय ते फाटक पर्यंतच्या सुमारे २ हजार ४०० फूट लांब पादचारी मार्गावर भाजपाच्या एका तत्कालीन  नगरसेवकाच्या  मागणी वरून महापालिकेने शेड उभारली . त्या लांब लचक शेड मध्ये लोकांना बसायला बाकडे बसवले गेले . मोठ्या संख्येने पंखे व वीज दिवे लावले गेले. 

वास्तविक शासन आदेशा नुसार नगरसेवक निधी मधून असे काम करण्याची तरतूद नाही . शिवाय महत्वाची लांब गल्ली नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोकळी ठेवणे आवश्यक होते . शेड उभारल्याने त्याखाली गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे . गर्दुल्ले , उनाड, नशा करणारे वा अन्य अनोळखी हे बाकड्यांवर  पडलेले असतात . प्रेमी युगुल सुद्धा बाकड्यांच्या आश्रयाला असतात . येथे राहणारे वा ये - जा करणाऱ्या लोकांना गर्दुल्ले , नशेडी , चोरटे यांची भीती वाटत असते . महिला व मुलींना असुरक्षित वाटते . त्यातच शेडच्या पत्र्यावर चढून चोरटे हे लगतच्या इमारतीतील घरां मध्ये घुसून घरफोड्या करत आहेत . अनेक घरां मध्ये चोऱ्या झाल्या आहेत . तर घरात घुसणाऱ्या चोरट्यां मुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे येथील रहिवासी सांगतात. 

येथील तपस्या , सालसार पार्क , श्री पार्श्व पूजा , नवकार , भीमनाथ , पशुपतीनाथ , बाबुलनाथ , भाईंदर त्रिशूल , शांती नगर , इंदिरा कॉम्प्लेक्स , देव दर्शन ह्या इमारतींसह तेथील रुग्णालय , खाजगी क्लासचालक आदींनी पत्रं दिली आहेत .  महापालिका व पोलिसां सह  येथील भाजपचे माजी नगरसेवक, आमदार गीता जैन आदीं ना भेटून शेड काढून टाकण्याची मागणी चालवली आहे . मात्र कोणी दाद देत नसल्याने रहिवाश्यांनी नुकतीच खासदार राजन विचारे यांच्यासह आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या . आयुक्तांनी आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले असले तरी खा . विचारे यांनी १० दिवसात शेड काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दया असे निर्देश दिले आहेत. 

Web Title: arrangement of fans, benches, etc. by erecting a shed of about a quarter of a kilometer on the footpath, but the safety of the local residents is at stake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.