राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाला अटक, घर बांधण्यास विरोधाचे कारण, बांगलादेशी व्यक्तीही अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:28 AM2017-12-03T02:28:21+5:302017-12-03T02:28:28+5:30

कळवा पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा प्रभाग समिती अध्यक्ष महेश साळवी यांच्याविरोधात घराच्या बांधकामाला विरोध करून ते तोडणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी, तर बांगलादेशी नागरिक असलेला जलील रशीद काझी याच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

The arrest of the Nationalist Congress Party | राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाला अटक, घर बांधण्यास विरोधाचे कारण, बांगलादेशी व्यक्तीही अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाला अटक, घर बांधण्यास विरोधाचे कारण, बांगलादेशी व्यक्तीही अटकेत

Next

ठाणे : कळवा पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा प्रभाग समिती अध्यक्ष महेश साळवी यांच्याविरोधात घराच्या बांधकामाला विरोध करून ते तोडणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी, तर बांगलादेशी नागरिक असलेला जलील रशीद काझी याच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात्या गुन्ह्यांखाली त्या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लोकमतला दिली.
तक्रारदार महिलेने शासकीय जागा असलेल्या मफतलाल कंपनी परिसरात जलील रशीद काझी यांच्याकडून लाखो रुपयांमध्ये घर विकत घेतले होते. त्या घरावर माळा बांधण्यास सुरुवात केली तेव्हा राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी तेथे जाऊन बांधकाम करण्यास विरोध करून ते तोडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्या महिलेच्या घरात शिरकाव करून तिला धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून साळवी यांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी दिली. तसेच शासकीय जागेत बांधकाम करून त्याची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी जलील काझी यालाही अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
काझी हा एकेकाळी साळवी यांचा कार्यकर्ता होता. तो शिवसेनेत गेल्याने वाद सुरूअसून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

अफवेप्रकरणी अटक
याचकाळात संंजय खत्री याने शिवसेनेच्या आॅफिसची तोडफोड केली जात असल्याची अफवा पसरवली होती.
या प्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू असल्याचेही बागडे यांनी सांगितले.

Web Title: The arrest of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक