अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; श्रीनगर पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2023 21:53 IST2023-10-06T21:52:30+5:302023-10-06T21:53:52+5:30
सोशल मिडियाद्वारे आधी केली मैत्री.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; श्रीनगर पोलिसांची कारवाई
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुलेमान मुल्ला (२२, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
वागळे इस्टेट परिसरातील पिडितेशी सुलेमान याने स्नॅपचॅटद्वारे मैत्री केली होती. तिचा विश्वास संपादन करुन तिला तिचे खासगी फोटोही पाठविण्यास त्याने भाग पाडले होते. तिनेही त्याला प्रतिसाद देत तसे फोटोही त्याला पाठविले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला गाठून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या कुटूंबियांना सांगितल्यानंतर याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १ ऑक्टाेंबर २०२३ रोजी विनयभंगासह पोक्सो अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या पथकाने सुलेमान याला ४ ऑक्टाेंबर राेजी अटक केली. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशही ठाणे न्यायालयाने दिले होते. आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.