परदेशी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्यांस अटक
By admin | Published: October 23, 2016 01:57 AM2016-10-23T01:57:33+5:302016-10-23T01:57:33+5:30
कुवेत, दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १४२ पासपोर्ट, बनावट व्हिसा, जेट एअरवेज
ठाणे : कुवेत, दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १४२ पासपोर्ट, बनावट व्हिसा, जेट एअरवेज विमानाचे बनावट तिकीट असा ऐवज जप्त केला आहे. या
मिळालेल्या पासपोर्टमध्ये नेपाळ देशातील लोकांचे पासपोर्ट सापडल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ठाणे, राबोडीतील नुरुल महमद हदीस हुदा अन्सारी (३५) आणि महमद सलीम सहेमदअली शहा (३८) अशी या दुकलीची नावे आहेत. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक देविदास
घेवारे यांचे पथक तपास करीत होते. दोघांना २६ आॅक्टोबरपर्यंत
पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती
पोलिसांनी सांगितली. (प्रतिनिधी)