व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवरून वन्य पक्ष्यांची तस्करी करणा-याला मुंबईतून अटक: दोघे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:19 PM2018-01-10T22:19:35+5:302018-01-10T22:28:49+5:30

वन्य पक्षी मुंबईत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाली होती. ज्यांनी या पक्ष्यांची विक्री केली, त्या पुण्यातील दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

 The arrest of wild birds smuggled from the WhoseSaap group from Mumbai: Both passes | व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवरून वन्य पक्ष्यांची तस्करी करणा-याला मुंबईतून अटक: दोघे पसार

पक्षी तस्करीचे पुणे कनेक्शन

Next
ठळक मुद्दे ठाणे वनविभागाची कारवाई पक्षी तस्करीचे पुणे कनेक्शनतीन बहिरी ससाण्यांसह पोपटाची सुटका

ठाणे: व्हॉटसअ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून वन्य पक्ष्यांची तस्करी करणा-या तिघांपैकी दीपक रामरुप निशाद (२५) याला ठाणे वनविभागाच्या अधिका-यांनी मुंबईतून अटक केली. त्याच्याकडून घार प्रजातीमधील तीन बहिरी ससाणे आणि एक पोपट असे चार पक्षी हस्तगत केले आहेत.
केवळ व्हॉटसअ‍ॅप गृपवर चर्चा करून पुण्यातून आणलेले वन्य पक्षी मुंबईत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाला होती. तिच्या आधारे दादर रेल्वे स्थानकासमोर आलेल्या दीपकला ७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनपाल एस. जी. बापकर, वनरक्षक निलेश मळेकर, आर. एस. ढमाले यांनी जेरबंद केले. त्याच्याकडून हे चारही पक्षी हस्तगत केले आहेत. त्यांची १५ हजारांमध्ये ‘सौदा’ करण्याचे ठरले होते. त्यानुसार दिपकने पुण्यातील संबंधित पक्षी तस्कराच्या बँक खात्यावर आधीच पाच हजार रुपये आॅनलाईन बँकींगद्वारे भरले होते. ते ताब्यात मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम तो त्याच खात्यावर वळते करणार होता. या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर ठाणे वनविभागाने रचलेल्या सापळ्यामध्ये दीपक अडकला. आता त्याला ज्यांनी या पक्ष्यांची विक्री केली, त्या पुण्यातील दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वनविभागाने दिली. दिपकला सुरुवातीला १० जानेवारीपर्यंत वन विभागाची कोठडी भोईवाडा न्यायालयाने दिली. तिची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्याला २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
व्हॉटसअ‍ॅप -तस्करी
वन्य पक्षी आणि प्राण्यांची माहिती असलेल्या दीपक आणि त्याच्या काही साथीदारांनी व्हॉटसअ‍ॅपवरच एक गृप बनविला आहे. एका गृपने पक्षी पकडल्यानंतर त्याची दुस-या जिल्हयातील गृपमध्ये विक्री केली जात होती. विशेष म्हणजे समोरासमोर न येताच केवळ व्हॉटसअ‍ॅपवरच संभाषण झाल्यानंतर संबंधित विक्रेत्याने दादर येथील एका टुरिस्टच्या वाहनामध्ये हे वन्य पक्षी ठेवून पलायन गेले. तेच पक्षी घेऊन दीपक वनविभागाच्या बनावट ग्र्राहकांकडे आला आणि जाळ्यात अडकला.

Web Title:  The arrest of wild birds smuggled from the WhoseSaap group from Mumbai: Both passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.