ठाण्यात व्यवसायासाठी सुटटया पैशांची आवश्यकता असल्याचे भासवून रोकड लंपास करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:30 PM2020-09-17T23:30:25+5:302020-09-17T23:33:25+5:30
दुकानासाठी सुटया पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलीवरी करणाऱ्यांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फैय्याज उस्मान मेमन यास नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नव्यानेच सुरु केलेल्या दुकानासाठी सुटया पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलीवरी करणाºयांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फैय्याज उस्मान मेमन (२९, रिक्षाचालक, रा. जोगेश्वरी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त करण्यात आली असून त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमान्यनगर येथील रहिवाशी प्रदीप गुणाजी गराटे (५४) हे त्यांच्या साक्षीदारासह ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या नौपाडयातील भास्कर कॉलनी येथील किराणा दुकानात त्यांच्या एजंसीच्या मालाची डिलेविरी देण्यासाठी आले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना नौपाडा परिसरात नव्याने दुकान सुरु केल्याची बतावणी केली. या दुकानातही त्यांना मालाचा भरणा करायचे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याच परिसरातील ‘श्री मांगल्य’ या इमारतीमध्ये वास्तव्याला असल्याचीही बतावणी करुन व्यवसायासाठी सुट्टया पैशांची निकड असल्याचे भासविले. त्यांच्याकडे मालाच्या डिलीवरी करतांना जमा झालेली ३६ हजारांची रोकडही त्यांच्याकडून घेतली. त्या बदल्यात बंदे पैसे त्याच्या वडीलांकडून घेण्यासाठी प्रदीप आणि त्याच्या साथीदाराला ‘श्री मांगल्य’ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाठवून ते दोघेही तिथून पसार झाले होते. त्यानंतर प्रदीप यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी फसवणूकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेºयामधील चित्रणाची पाहणी केली. तेंव्हा फसवणूक करणाºयाचा आणखी एक साथीदार रिक्षा घेऊन आल्याचे आढळले. त्याच रिक्षातून दोघेही पळून गेल्याचे उघड झाले. याच सीसीटीव्हीतील फूटेजच्या आधारे तसेच परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत रिक्षाचा क्रमांक मिळवून फैय्याज मेमन या रिक्षा चालकाला १४ सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली. त्याने या लुटीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.