इंस्टाग्रामवर ओळखीतून महिलेवर बलात्कार करणाऱ्यास अटक
By धीरज परब | Updated: February 27, 2025 22:52 IST2025-02-27T22:51:45+5:302025-02-27T22:52:15+5:30
Mira Road Crime News: मीरारोडच्या काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका महिलेची इंस्टाग्राम वर गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये महादेव बाळासाहेब सावंत ( वय ३३ वर्षे ) रा. मुप्या, वडवणी, बीड याच्याशी ओळख झाली होती.

इंस्टाग्रामवर ओळखीतून महिलेवर बलात्कार करणाऱ्यास अटक
मीरारोड - मीरारोडच्या काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका महिलेची इंस्टाग्राम वर गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये महादेव बाळासाहेब सावंत ( वय ३३ वर्षे ) रा. मुप्या, वडवणी, बीड याच्याशी ओळख झाली होती.
सावंत याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या नंतर महिलेशी मैत्री करुन लग्न करण्याचे अमिष दाखवले. तिच्यावर मीरारोड, आळंदी, बीड येथे वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले . दोघांचे अश्लिल फोटो इस्टाग्राम स्टोरीवर ठेवुन व्हायरल. महिलेची बदनामी केली तसेच तीला मारहाण केली. महिलेच्या फिर्याद नंतर काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत महादेव सावंत ह्याला अटक केली आहे.